Breaking News

केंद्रीय मंत्री नारायण राणें म्हणाले, सत्तेचा गैरवापर कराल तर याद राखा संतोष परबवरील हल्ला प्रकरणी पोलिसांनी केली होती नीतेश राणेंची चौकशी

मराठी ई-बातम्या टीम

जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने सध्या सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीत वातावरण तापलेले असताना काही दिवसांपूर्वी संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नीतेश राणे यांची पोलिसांनी चौकशी केली. परंतु आता त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत असून ही शक्यता गृहीत धरूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपले पुत्र तथा भाजपाचे आमदार नीतेश राणे यांना महाविकास आघाडी सरकार खोट्या प्रकरणात गुंतवून अटक करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करत राज्य सरकार विरोधकांना संपविण्यासाठी बळाचा वापर करत असल्याचे ते म्हणाले.

तसेच राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून सुडाचे आणि आकसाचे राजकारण करत असून पोलिसांनीही जर राज्य सरकारचे ऐकून कारवाई केल्यास आम्हीही स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही नारायण राणे यांनी देत केंद्रात आमचेही सरकार आहे असे सूचक विधान केले.

संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नीतेश राणे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांना पोलिसांकडून जाणीवपूर्वक चौकशीला बोलावित आहेत. तसेच या प्रकरणातील खोट्या आरोपात या दोघांनाही अटक करण्याची तयारी सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सत्तेचा गैरवापर कराल तर याद राखा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, संतोष परब यांच्यावर हल्ल्याप्रकरणी सिंधुदूर्ग पोलिसांनी दोघांना अटक केली असून यातील एक हल्लेखोर भाजपा आमदार नीतेश राणे यांच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच महत्व आले आहे. मात्र अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बाबत पोलिसांकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. परंतु राणे पिता-पुत्रांना चांगलाच धडा शिकविण्याची रणनीती शिवसेनेने आखली असून पोलिसांनी परब प्रकरणी संशयित असलेल्या आरोपींना केवळ आमदार आहे म्हणून मोकळीक न देता कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेना आमदारा वैभव नाईक यांनी दिला.

याशिवाय विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही महाविकास आघाडी सरकार पोलिसी बळाचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून यापूर्वी याच सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केवळ द्वेषभावनेतून अटक केल्याचा आरोप केला.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *