Breaking News

राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ ओमायक्रॉनचे ३१ तर कोरोनाचे १६४८ रूग्ण आढळून आले

मराठी ई-बातम्या टीम

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत होते. तर ओमायक्रॉनचे रूग्ण एकदं-दुसरा आढळून येत होता. परंतु नववर्ष स्वागतानिमित्त खरेदीच्या आणि अन्य कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरीकांकडून काहीप्रमाणात निष्काळजीपणा होत आहे. यापार्श्वभूमीवर आज कोरोनाचे १६४८ रूग्ण आढळले असून यापैकी सर्वाधिक रूग्ण ८९६ मुंबईत आढळून आले आहेत. मागील आठवड्यापर्यंत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५०० ते ७०० च्या दरम्यान आढळून येत होते.

तसेच आजच राज्यात ओमायक्रॉनचे ३१ इतके रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक रूग्ण मुंबईत असून एकट्या मुंबईत २७ रूग्ण आढळून आले. त्यानंतर ठाणेमध्ये २ तर पुणे ग्रामीण आणि अकोला येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. आढळून आलेल्या रूग्णांमध्ये १७ पुरूष आणि १४ स्त्रीयांचा समावेश आहे. तसेच १८ वर्षाखालील ६ जण तर ६० वर्षावरील ३ व्यक्तींचा समावेश असून यातील ३० जणांचा परदेशी प्रवासाचा इतिहास आहे. तसेच १८ वर्षाखालील ६ आणि ३ जण वगळता २२ जणांचे लसीकरण झालेले आहे. तसेच २ जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे तर २९ जणांना कोणतीही लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १४१ झाली आहे.

अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई ७३*
पिंपरी चिंचवड १९
पुणे ग्रामीण १६
पुणे मनपा
सातारा, उस्मानाबाद प्रत्येकी ५
ठाणे मनपा
कल्याण डोंबिवली, नागपूर, औरंगाबाद प्रत्येकी २
बुलढाणा, लातूर, अहमदनगर, अकोला. वसई विरार, नवी मुंबई , मीरा भाईंदर प्रत्येकी १
एकूण १४१
*यातील ४ रुग्ण गुजरात, ३ रुग्ण कर्नाटक, २ रुग्ण केरळ आणि दिल्ली येथील तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहेत तर २ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय कोरोना बाधितांची संख्या:-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८९६ ७७०९१० १६३७०
ठाणे १५ १०१३३३ २२२७
ठाणे मनपा ६७ १४५६८० २१२४
नवी मुंबई मनपा ६६ १२२२९५ २०११
कल्याण डोंबवली मनपा २७ १५३६३५ २८७३
उल्हासनगर मनपा २२०८१ ६६२
भिवंडी निजामपूर मनपा ११३३२ ४८९
मीरा भाईंदर मनपा १९ ६०१७६ १२०५
पालघर १० ५६५७५ १२३३
१० वसईविरार मनपा २० ८२५९४ २०७९
११ रायगड १६ ११८८३८ ३३८९
१२ पनवेल मनपा ४० ७८६८५ १४३५
ठाणे मंडळ एकूण ११८० १७२४१३४ ३६०९७
१३ नाशिक १८ १६४५८२ ३७५४
१४ नाशिक मनपा २५ २३८४३८ ४६५५
१५ मालेगाव मनपा १०१६४ ३३६
१६ अहमदनगर ४६ २७४५८७ ५५१८
१७ अहमदनगर मनपा ६८८७५ १६३६
१८ धुळे २६२१७ ३६२
१९ धुळे मनपा १९९५९ २९४
२० जळगाव १०७०२१ २०५९
२१ जळगाव मनपा ३२८९२ ६५७
२२ नंदूरबार ४००१६ ९४८
नाशिक मंडळ एकूण ९७ ९८२७५१ २०२१९
२३ पुणे ६४ ३६९४०९ ७०२४
२४ पुणे मनपा १३८ ५२५३४२ ९२४६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६६ २७०९४६ ३५२०
२६ सोलापूर १७८६८९ ४१२७
२७ सोलापूर मनपा ३२७३२ १४७५
२८ सातारा १२ २५१५७८ ६४९३
पुणे मंडळ एकूण २८४ १६२८६९६ ३१८८५
२९ कोल्हापूर १५५४०७ ४५४४
३० कोल्हापूर मनपा ५१५७२ १३०६
३१ सांगली १६४४१६ ४२८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४५८०२ १३५२
३३ सिंधुदुर्ग ५३०२८ १४४८
३४ रत्नागिरी ७९१७२ २४९६
कोल्हापूर मंडळ एकूण १८ ५४९३९७ १५४२६
३५ औरंगाबाद ६२६०१ १९३५
३६ औरंगाबाद मनपा ९३५०५ २३२९
३७ जालना ६०८२५ १२१५
३८ हिंगोली १८४८९ ५०८
३९ परभणी ३४१९१ ७९३
४० परभणी मनपा १८२६३ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण १५ २८७८७४ ७२२३
४१ लातूर ६८४९० १८०१
४२ लातूर मनपा २३८७३ ६४३
४३ उस्मानाबाद ६८१२५ १९८६
४४ बीड १०४१६० २८३८
४५ नांदेड ४६५४५ १६२६
४६ नांदेड मनपा ४३९६० १०३४
लातूर मंडळ एकूण ११ ३५५१५३ ९९२८
४७ अकोला २५५४० ६५५
४८ अकोला मनपा ३३२८३ ७७३
४९ अमरावती ५२५०२ ९८९
५० अमरावती मनपा ४३८०७ ६०९
५१ यवतमाळ ७६०४५ १८००
५२ बुलढाणा ८५६४६ ८०८
५३ वाशिम ४१६८१ ६३७
अकोला मंडळ एकूण १३ ३५८५०४ ६२७१
५४ नागपूर १२९५९० ३०७५
५५ नागपूर मनपा २८ ३६४२५४ ६०५३
५६ वर्धा ५७३६३ १२१८
५७ भंडारा ५९९९६ ११२४
५८ गोंदिया ४०५१७ ५७०
५९ चंद्रपूर ५९३९१ १०८८
६० चंद्रपूर मनपा २९६४८ ४७६
६१ गडचिरोली ३०४७६ ६६९
नागपूर एकूण ३० ७७१२३५ १४२७३
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण १६४८ ६६५७८८८ १७ १४१४३३

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *