Breaking News

बंद पडलेली एलआयसी पॉलिसी पुन्हा सुरू होणार, जाणून घ्या एलआयसीची नवीन मोहीम बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरु होऊ शकते

तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल, परंतु काही कारणास्तव तुमची पॉलिसी बंद झाली असेल तर ती पुन्हा सुरू केली जाऊ शकते. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने वैयक्तिक लॅप्स झालेल्या पॉलिसींच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. एलआयसीने ३१ ऑगस्ट २०२३ रोजी आपला ६७ वा वर्धापन दिन साजरा केला. या वेळी एलआयसी एक विशेष मोहीम सुरू करण्याची घोषणा केली. ही मोहीम १ सप्टेंबर २०२३ पासून प्रभावी होईल.

एलआयसीच्या या मोहिमेअंतर्गत बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत तुम्ही तुमचा विमा हप्ता व्याजासह भरू शकता. वेळेवर प्रीमियम न भरल्यामुळे तुमची पॉलिसी लॅप्स झाली असेल तर तुम्ही ती पुन्हा सुरू करेपर्यंत पॉलिसी कराराच्या अटी व शर्ती रद्दबातल राहतील. एलआयसीकडे विमा योग्यतेचा पुरावा सादर केल्यावर आणि वेळोवेळी निर्धारित दराने व्याजासह सर्व प्रीमियम देय रक्कम भरल्यानंतर योजनेच्या अटींनुसार कालबाह्य पॉलिसी पुन्हा सुरू केली जाऊ शकते. मात्र, रद्द केलेली पॉलिसी पुनरुज्जीवित करण्याचा किंवा न करण्याचा अधिकार एलआयसीकडे आहे.

एलआयसीच्या वेबसाइटनुसार पॉलिसीधारकाने किमान ३ पूर्ण वर्षांसाठी प्रीमियम भरला असेल आणि त्यानंतर प्रीमियम भरणे थांबवले असेल आणि पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या देय तारखेपासून सहा महिन्यांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाला असेल तर पॉलिसीचे पैसे पूर्ण भरले जातील. मृत्यूच्या तारखेपर्यंत न भरलेल्या प्रीमियमवर व्याजासह पैसे पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला दिले जातील. पॉलिसीधारकाने किमान ५ पूर्ण वर्षांसाठी प्रीमियम भरला असेल आणि त्यानंतर प्रीमियम भरणे थांबवले आणि विमाधारकाचा पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या देय तारखेपासून १२ महिन्यांच्या आत मृत्यू झाला तर पूर्ण रक्कम वजा केल्यावर पेमेंट केले जाईल.

व्हॉट्सअॅपवर एलआयसी पॉलिसी सेवा कशी मिळवायची

– ‘हाय’ टाइप करा आणि व्हॉट्सअॅप ऍप्लिकेशनद्वारे 8976862090 वर पाठवा.

–  तुम्हाला निवडण्यासाठी ११ पर्याय मिळतील. सेवा निवडण्यासाठी पर्याय क्रमांकासह चॅटमध्ये उत्तर द्या. उदाहरणार्थ, तुमचा पुढील एलआयसी पॉलिसी प्रीमियम कधी भरायचा आहे आणि तुम्हाला किती प्रीमियम भरावा लागेल हे जाणून घ्यायचे असल्यास १ पाठवा.

Check Also

इन्कम टॅक्स

देशातील एक लाख लोकांना इन्कम टॅक्सची नोटीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर दिनाच्या कार्यक्रमात ही दिली माहिती

इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करताना गडबड करणाऱ्या एक लाख लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. केंद्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *