Breaking News

Tag Archives: lic

नाना पटोलेंचा सवाल, मोदी सरकार अदानी समुहातील गैरकारभाराच्या चौकशीला का घाबरते ? जनतेच्या एका-एका पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो’ चे सरकार आहे असे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत होता ते खरे ठरले आहे. खा. राहुल गांधी हे नेहमी अदानी व मोदी यांच्या घनिष्ठ संबंधावर बोलत होते. अदानीचा फुगा फुटेल असेही राहुल यांनी सांगितले होते. उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी करोडो …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, पंतप्रधान मोदींच्या आशिर्वादानेच LIC, SBI जनतेचा पैसा बुडण्याची भिती सोमवारी ६ तारखेला राज्यातील SBI , LIC कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. …

Read More »

अदानीप्रकरणावर अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या, भारताची आर्थिक स्थिती उत्तम हिंडेनबर्ग आणि अदानी वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया

२०१४ साली देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आल्यापासून केंद्र सरकारच्या मालकीच्या एकूण संस्थांपैकी जवळपास ६० टक्के संस्था एकट्या अदानी उद्योग समुहाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. तसेच देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी ६० टक्के पैसा कर्ज स्वरूपात भारतीय बँकानी अदानी समुहाला दिल्याची माहिती पुढे येत असतानाच अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने …

Read More »

काँग्रेसची टीका, उद्योगपती अदानींवरील पंतप्रधान मोदींच्या प्रेमामुळे अर्थव्यवस्थेसमोर संकट अदानी’मुळे LIC व SBI मधील कोट्यवधी गुतवणुकदारांचे कष्टाचे पैसे धोक्यात !: अतुल लोंढे

अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार हिंडनबर्ग संशोधन संस्थेने उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगवलेला फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समूहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान …

Read More »

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर कंपन्यांचा रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने २०२०-२१ चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, एकूण ११.०१ लाख दावे कंपन्यांना वैयक्तिक जीवन विमा प्रकरणी प्राप्त झाली होती. यापैकी आयुर्विमा कंपन्यांनी १०.८४ लाख दावे भरले. या दाव्यांची रक्कम …

Read More »

देशातील सर्वात मोठा IPO: LIC चा IPO येणार या कालावधीत नव्या वर्षाच्या तिमाहीत येणार

मुंबई: प्रतिनिधी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा आयपीओ (IPO) चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान येऊ शकतो. पेटीएम नंतरचा हा भारतातील सर्वात मोठा IPO असेल. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी बुधवारी ही माहिती दिली. LIC मधील १० टक्के …

Read More »

एअर इंडियानंतर आता सरकारी मालकीच्या या कंपन्यांचे होणार खाजगीकरण १.७५ लाख कोटी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट

नवी दिल्ली: प्रतिनिधी एअर इंडियाची कमान टाटा समूहाकडे सोपवल्यानंतर आता केंद्र सरकार खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वेगाने पावले उचलेल. २०२१-२२ या आर्थिक वर्षात मोदी सरकार अर्धा डझनहून अधिक कंपन्यांचे खाजगीकरण किंवा निर्गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. सरकारने या आर्थिक वर्षात निर्गुंतवणूकीकरणातून १.७५ लाख कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले …

Read More »

जाणून घ्या, बँकींग क्षेत्रातील अध्यक्ष, एमडीना किती वेतन मिळते ? एलआयसीच्या सीएफओंना अध्यक्षांपेक्षाही मिळणार जास्त वेतन

मुंबई : प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) सीएफओ (CFO) ची नेमणूक करणार आहे. एलआयसीने सीएफओ पदासाठी अर्ज मागवले होते. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर होती. एलआयसी सीएफओला अध्यक्षांपेक्षा जास्त पगार देणार असल्याचं समोर आलं आहे. सीएफओला वार्षिक ७५ लाख ते १ कोटी …

Read More »

दरमहा २५८२ रुपयांच्या बचतीवर मिळतील १ कोटी जाणून घ्या एलआयसीची खास पॉलिसी

मुंबई: प्रतिनिधी कमी जोखीम असलेल्या आणि सुरक्षित पर्यांयांमध्ये गुंतवणूक करण्याकडे सर्वांचाच कल असतो. यामध्ये एलआयसीच्या गुंतवणूक योजनांना अनेकांकडून प्राधान्य दिलं जातं. जीवन उमंग पॉलिसी ही एलआयसीची अशीच एक जोखीम नसलेली योजना.एलआयसीच्या जीवन उमंग पॉलिसीमध्ये विमा संरक्षणाचा लाभ पॉलिसीधारक जिवंत असे पर्यंत चालू राहतो. या पॉलिसीमध्ये तुम्ही दर महिना २५८२ रुपयांची …

Read More »

आत्मनिर्भर अर्थसंकल्प : सरकारी कंपन्या विक्रीला- जनतेच्या आरोग्यासाठी नव्या योजना केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला अर्थसंकल्प

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना काळातील वाईट परिस्थितीनंतर अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीले, मात्र आत्मनिर्भर अर्थसंकल्पाच्या नावाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वे विभागाच्या मालकीच्या जमिन विक्रीतून लाखो कोटी रूपये उभारण्यात येणार असून यापाठोपाठ एलआयसी विमा कंपनीच्या विक्रीच्यादृष्टीने त्याचा आयपीओ बाजारात आणला जाणार आहे.  तसेच विमा क्षेत्रातील सरकारी कंपन्यांची सद्दी …

Read More »