Breaking News

वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फळके पुरस्कार केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली घोषणा

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अनुराग ठाकूर यांनी यंदा दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली. हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना हा सर्वोच्च पुरक्रार देण्यात येणार आहे. केंद्र सरकारे यंदाच्या दादासाहेब फाळके हा पुरस्कार हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची निवड केली जाते. त्यानुसार यंदाच्या वर्षीसाठी वहिदा रेहमान यांची निवड करण्यात आली.

वहिदा रेहमान यांना पहिली संधी प्रसिध्द चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक गुरुदत्त यांनी संधी दिली. गुरूदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या कागज के फूल, साहब बीबी और गुलाम, चौहदवी का चाँद सारख्या एकपेक्षा एक यादगार चित्रपटांमध्ये अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या. त्यानंतर देव आनंद यांच्या सोबतचा गाईड चित्रपट तर सुपरडुपर हिट ठरला होता. त्यानंतर खामोशी हा राजेश खन्ना यांच्याबरोबरील चित्रपटातील वहिदा रेहमान यांच्या अभिनयाने तर चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. याशिवाय वहिदा रेहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची तर कधी प्रेयसीची भूमिका साकारली.

तसेच वहिदा रेहमान यांनी साकारलेली रंग दे बसंती या चित्रपटातील एका वायुदलातील सैनिकाच्या आईची साकारलेली छोटी भूमिका चित्रपट रसिकांच्या लक्षात चांगलीच राहिली.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *