Breaking News

“तमाशा महोत्सव” परभणीला आयोजित करण्याचा सांस्कृतिक कार्य खात्याचा घाट ?

मुंबई : प्रतिनिधी

दरवर्षी वाशी (नवी मुंबई) येथे होणारा तमाशा महोत्सव थेट परभणी येथे आयोजित करण्याचा घाट सांस्कृतिक कार्य खात्यातील काही हट्टी अधिकाऱ्यांनी घाट घातला आहे. त्यामुळे यावर्षी नागरी भागातील कला रसिकांना तमाशा महोत्सवाला मुकावे लागणार आहे.

   तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगावकर यांच्या निधनानंतर दरवर्षी राज्य सरकारने त्यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार आणि पाच दिवस तमाशा महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कै. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने असलेला  सन २००५-२००६ यावर्षीचा पहिला जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ लोक कलावंत कांताबाई सातारकर यांना नारायणगाव जि. पुणे येथे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला होता. तिथेच पाच दिवस तमाशा महोत्सव पार पडला.

   परंतु हा ग्रामीण भागातील रांगडा तमाशा शहरी भागातील लोकांना जवळून बघता यावा म्हणून त्यानंतरचे सर्व तमाशा महोत्सव हे वाशी(नवी मुंबई) येथील सिडकोच्या मैदानात आयोजित करण्यात आले. त्या भागात कृषी बाजार समिती, माथाडी मंडळे आदी मराठी माणसांचे वास्तव्य आहे. त्याच प्रमाणे मानखुर्द गोवंडी शिवाजी नगर,चेंबूर येथील मध्यमवर्गीय शहरी भागातील तमाशा कला प्रेमी तमाशा बघायला येत.

   बेलापूर, नेरुळ, जुईनगर , तुर्भे अगदी पनवेल येथून अनेक तमाशा रसिक आपापल्या भागातील तमाशे या पाच दिवसात बघायला येतात. ग्रामीण भागात दरवर्षी यात्रे निमित्त तेथील मंडळींना तमाशा बघण्याची संधी मिळते परंतु ही रांगडी कला शहरी भागात पोहचली पाहिजे ही मूळ कल्पना मोडीत काढून आता हा पाच दिवसांचा तमाशा महोसत्व थेट परभणीला घेवून जाण्याचा विचार सांस्कृतिक कार्य खात्यातील काही अधिकाऱ्यांनी केला.

  वाशी हे मुंबईच्या हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्य संचालनायचे अधिकारी पाच दिवस आपल्या कार्यालयाचे दैनंदिन कामकाज उरकून संध्याकाळी नियोजनासाठी जावू शकते. परंतु परभणी येथे तमाशा महोत्सव आयोजित केल्यानंतर किमान तीन चार अधिकारी तिकडे अडकून पडतील, अन साध्य काहीच होणार नाही.

  न्यायालयाच्या अडचणीमुळे तमाशा फडांना सध्या मुंबईत बंदी आहे. पूर्वी प्रबोधनकार ठाकरे उद्यान, रंगभवन, लालबागचे  हनुमान थिएटर,मानखुर्द येथील शाळेचे पटांगण आदी भागात तिकिटावर तमाशे सादर होत असत. परंतु आज ही पारंपरिक मराठी माणसाची लोककला मुंबईत शिरू शकत नाही. त्यात सांस्कृतिक कार्य खात्याने जर वाशी येथे ही तमाशा महोत्सव आयोजित करण्याचा घाट घातला तर मग तमाशा कलावंताची अवस्था अडला नारायण धरी…..अशी होईल.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *