Breaking News
रंगीले फंटर

‘रंगीले फंटर’ शाळकरी जीवनातली धमाल गोष्ट 'रंगीले फंटर' या चित्रपटाच्या पोस्टरवर दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन, तसेच वाळत घातलेल्या कपड्यांमागे चेहरे लपवलेली चार मुले दिसतात.

शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट ‘रंगीले फंटर’ या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.

ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले फंटर’ चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. अक्षय गोरे यांनी कथा, पटकथा, संवाद लेखन, नितीन रायकवार, कौस्तुभ पणत यांनी गीतलेखन, राजा अली यांनी संगीत दिग्दर्शन, राजदत्त रेवणकर यांनी छाया दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन आणि सिद्धेश मोरे यांनी संकलन केलं आहे. कलादिग्दर्शक म्हणून प्रकाश सिनगारे यांनी काम पाहिले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून बाबासाहेब पाटील यानी काम पाहिले आहे. चित्रपटातील कलाकरांची नावे अद्याप गुलदसत्यात ठेवण्यात आली असून पोस्टर मध्ये दिसणारी ती चार मुल कोण असणार ? याबाबत आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘रंगीले फंटर’ या चित्रपटाच्या पोस्टरवर दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन, तसेच वाळत घातलेल्या कपड्यांमागे चेहरे लपवलेली चार मुले दिसतात. त्यामुळे शाळकरी मित्रांची धमाल गोष्ट या चित्रपटात असल्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. त्यामुळे नावाप्रमाणेच हा चित्रपट नक्कीच पुरेपूर मनोरंजन करणारा असेल यात शंका नाही.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *