Breaking News

ज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन वयाच्या ८८ वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रतिनिधी

प्रसिद्ध बॉलिवूड आणि टि.व्हीवरील अभिनेत्री शशिकला जावळकर यांचं निधन झालं आहे. त्या ८८ वर्षांचं होत्या. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तब्बल दोन दशकं त्यांनी गाजवली आहेत.

शशिकला जावळकर यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ साली सोलापूर शहरात झाला. त्यावेळी त्या जूना मधला मारूती परिसरात रहात होत्या. तेथील प्रशस्त असलेले घर आजही त्यांच्या नावाने ओळखले जाते. त्यांना शालेय जीवनापासूनच नृत्य, अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत होत्या. पुढे काही कारणास्तव त्यांचे वडील मुंबईत स्थाईक झाल्याने शशिकला यांनाही मुंबईत स्थलांतरीत व्हावे लागले. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने त्यांनी चित्रपटात भूमिका मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले.

सुरुवातीला त्यांना पहिल्यांदा झीनत या चित्रपटातील कवालीत गाण म्हणण्याचा अभिनय करण्याची संधी मिळाली. मात्र शशिकला यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात व्ही.शांताराम यांच्या तीन बत्ती चार रस्ता या चित्रपटानंतर आकारास येण्यास सुरुवात झाली. त्यांनी जवळपास १०० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांच्या अनेक व्यक्तीरेखा या खलनायिका स्वरूपाच्या होत्या. तर काही भूमिका विनोदी ढंगाच्या होत्या. शशिकला यांनी धर्मेद्र ते सलमान खान यांच्यासोबत काम केले. तर पृथ्वीराज कपूर अभिनित तीन बहुरानीया चित्रपटातही त्यांनी महत्वाची भूमिका केली. याशिवाय त्या काळच्या अनेक स्टार असलेल्या रेखा, आशा पारेख सारख्या नामांकित अभिनेत्रींसोबत सह अभिनेत्री म्हणून काम केले. त्याबद्दल फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. मागील काही वर्षांपासून दूरचित्रवाणी वरील काही मालिकांमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली होती.

शशिकला यांच्या निधनामुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक नेत्यांनी आणि कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *