Breaking News

भारत बंद आंदोलनात हे ११ राजकिय पक्ष होणार सहभागी संयुक्त निवेदन जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

चर्चेविना केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विधेयकांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंदची हाक दिली. त्या हाकेला प्रतिसाद देत देशभरातील ११ राजकिय पक्षांनी पाठिंबा देत त्यात सहभागी होणार असल्याचे संयुक्त पत्रकही काढण्यात आले.

या भारत बंद आंदोलनात काँग्रेसने सक्रिय सहभाग घेणार असल्याचे जाहीर केले असून त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, पीएमजीडी, सीपीआयएम, सीपीआयएमएल, आरएसपी, डिएमके, समाजवादी पार्टी, सीपीआय, एआयएफबी आदी ११ राजकिय पक्षांनी पाठिंबा देत या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून तसे संयुक्त परिपत्रक ही काढले आहे.

Check Also

प्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक 5 डिसेंबरला जागतिक मृद दिनी गावांमध्ये कार्यशाळा घेण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावातील जमीनीतील अन्न घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *