Breaking News

सिरम इस्टीट्युटची कोरोना लस लवकरच बाजारात अदार पुनावला यांची ट्विटरवरून माहिती

मुंबईः प्रतिनिधी
कोरोनावरील (Corona/ Covid-19) तयार करण्यात आलेली लस (Vaccine) राज्यासह देशभरात अत्यावश्यक काळात वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी सिरम इस्टीट्युटने (Serum Institute)  नुकतीच केंद्र सरकारकडे केल्याची माहिती इस्टीट्युटचे प्रमुख अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विटरद्वारे दिली.
सध्या अमेरिकेची मॉर्डना आणि इंग्लडमध्ये फायझर या दोन कोरोनावरील लस आंतरराष्ट्रीय बाजारात आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या लसीचे उत्पादन भारतात करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. या दोन कंपन्यांना जर भारतात परवानगी मिळाली तर सिरम इस्टीट्युटला आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिरमकडून त्यांची कोविशिल्ड ही लस बाजारात आणण्याच्या हालचाली सुरु झाली आहे. त्याचाच भाग म्हणून २०२१ पूर्वी कोरोनाची लस बाजारात आणण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारकडे यासंदर्भातील परवानगी मागण्यात आली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या फॉर्म्युल्यानुसार सिरम इस्टीट्युटने कोविशिल्ड (Covishild) ही कोरोनावरील लस तयार केली आहे. आता ही लस रूग्णांवरील उपचारासाठी वापरण्यास परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांच्या मागणीला केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच सहकार्य करतील अशी आशा पुनावाला यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केली.

Check Also

मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश, परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरा

परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील शुश्रूषा, शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील तसेच प्राचार्यांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *