Breaking News

‘फॅन्ड्री‘ आणि ‘हाफ तिकीट’या पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या टीमचा आगामी सिनेमा २३ फेब्रुवारीला येणार सई-शरदचा ‘राक्षस’

मुंबई : प्रतिनिधी

आजच्या काळात खऱ्या अर्थाने वेगळ्या धाटणीचे सिनेमे तयार होत असल्याने मराठी सिनेमा जागतिक पातळीवर कौतुकास पात्र ठरत आहे. ‘नावात काय आहे?’ असं बऱ्याचदा गंमतीने म्हटलं जातं, पण तसं पाहिलं तर नावात म्हणजेच चित्रपटाच्या शीर्षकातच कथानकाचा गोषवारा दडलेला असतो. पण या विचाराला छेद देत बहुतांश रसिकांच्या परिचयाचा नसलेल्या शब्दाचं शीर्षक असलेला ‘फॅन्ड्री’सारखा सिनेमा बनला आणि तो पुरस्कारप्राप्तही ठरला. याचप्रमाणे ‘हाफ तिकीट’सारखा वेगळ्या आशयाचा सिनेमाही देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमधील जाणकारांची शाबसकी मिळवण्यास पात्र ठरला. आता याच टिमचा ‘राक्षस’हा सिनेमा २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘राक्षस’हा शब्द उच्चारताच मनात निर्माण होते. जंगल हे फक्त जीवसृष्टीनेच भरलेलं नसून त्यात अनेक क्लिष्ट कोडी दडलेली असतात. जेव्हा सामान्य माणूस हा जंगलांच्या गूढ दुनियेत शिरतो तेव्हा नेमकं काय घडतं हे ‘राक्षस’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठी मधील बहुचर्चित  सस्पेन्स थ्रिलर असलेल्या ‘राक्षस’या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यामुळे ‘राक्षस’बद्दलची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड फिल्म्स’प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ने आपल्या हटके अशा शीर्षकामुळे सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण केली असून ट्रेलरमुळे त्यात भर पडली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी ‘राक्षस’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे. ‘राक्षस’ ही एक जंगलात घडणारी कथा आहे. जंगल म्हणजे फक्त घनदाट झाडांचा समूह नाही तर त्याला ही भावना असतात, जंगल हसतं, रडतं, गाणं  गातं. किर्रर्र अशा अरण्यात  एक छोटी मुलगी आपल्या आईला सांगतेय  बाबांना  राक्षसाने गिळलय’,  तर दुसरीकडे सई ताम्हणकर कशाचा तरी शोध घेताना दिसत आहे. शरद केळकर आदिवासी पाड्यावर तर कधी जंगलात दिसतोय. हे नेमकं काय रहस्य आहे? याचे उत्तर  ‘राक्षस’ या चित्रपटात बघायला मिळणार आहे. या चित्रपटात बालकलाकार ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सईद, पूर्णानंद वांदेकर, उमेश जगताप, विठ्ठल काळे, पंकज साठे, अनुया कळसकर, अनिल कांबळे, मकरंद साठे, जयेश संघवी, सविता प्रभुणे, साक्षी व्यवहारे, अभिजित झुंझारराव, सोमनाथ लिंबारकर इत्यादी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

 

Check Also

छोट्या छोट्या गोष्टीतील सुख दाखविणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन ९० व्या वर्षी निधन

मुंबई: प्रतिनिधी मानवी आयुष्य क्षणभंगुर असले तरी या वाट्याला आलेल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीत खुप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *