Breaking News

केतकी चितळे हिची मराठा आंदोलनात उडी एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच पेटला आहे. या मुद्द्यावरून राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने, निदर्शने सूरू आहेत. आमदारांची घरे पेटवली जातायत. तसेच आमदार, मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या व अडवल्या जातायत. एसटी बसची तोडफोडीच्या घटना अनेक जिल्ह्यातून समोर आल्या आहे. एकूणच मराठा समाज आरक्षण घेण्याच्या मागणीवर पेटून उठला.

या सर्व घडामोडीवर आता अभिनेत्री केतकी चितळेने एक पोस्ट लिहली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने मराठा आंदोलकांना अनेक सवाल केले आहे. मात्र तिच्या या भूमिकेवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले आहे. केतकीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने मराठा आंदोलकांना अनेक सवाल केले आहेत.

या व्हिडिओत एक तरूण रस्त्यावर धावत असलेल्या एसटीच्या समोर येतो आणि काचेवर दगड मारतो,असे या व्हिडिओ दिसते आहे. या व्हिडिओचा आधार घेऊन, एसटी विभाग आणि चालक आरक्षण कसे देणार ? चुकून दगड चालकाला लागला तर? सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? असे सवाल केतकी चितळेने मराठा आंदोलकांनी केले आहेत

काय म्हंटल आहे पोस्टमध्ये वाचा !

एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?
इंडियाला युनिफॉर्म सिविल कोड हवा असेल (UCC), पण भारताला #Uniformcivillaw तसेच #Uniformcriminallaw ची गरज आहे.
सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एसटी विभाग आणि चालक कसे देणार आरक्षण, चुकून तो दगड चालकाला लागला असता तर?

!!जय हिंद!!
!!वंदे मातरम !!
!!भारत माता की जय !!

Check Also

टायगर ३’ने पहिल्याच दिवशी मोडला ‘गदर २’चा रेकॉर्ड

अभिनेता सलमान खानने यंदाच्या दिवाळीत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. दिवाळीच्या मुहुर्तावर सलमानचा ‘टायगर ३’ प्रेक्षकांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *