Breaking News

फडणवीसांचे नवाब मलिकांवर गंभीर आरोप…दाऊद आणि मेननच्या व्यक्तींसोबत व्यवहार दाऊद आणि १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी केली जमिन खरेदी

मुंबईः प्रतिनिधी
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि टायगर मेननचा विश्वासू असलेल्या सरदार शाहवली खान दाऊदची बहिण हसिना पारकर हिचा बॉडीगार्ड सलिम पटेल यांच्याकडून कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील ऐन मोक्याची जागा २.८० एकर जमिन अवघ्या ३० लाख रूपयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खरेदी केल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रविण दरेकर आणि आशिष शेलार उपस्थित होते.
यासंदर्भातील सर्व कागदपत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पाठविणार असून पुढील कारवाईसाठी अप्रोप्रिएट अॅथोरीटीकडे सोपविणार सोपविणार असल्याचा इशाराही त्यांनी नवाब मलिक यांना दिला.
सरदार शाहवली खान हा १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी असून मेनन याच्या घरून आरडीएक्सने भरलेला ट्रक त्याने पोहोचविला होता. तसेच मुंबईतल्या बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता. याप्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल होवून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. कालांतराने सर्वोच्च न्यायालयानेही त्याच्या जन्मठेप शिक्षा कायम ठेवली. तसेच त्याच्यावर टाडा कायद्याखाली सदर आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार सरकारला आहेत. मात्र आपली मालमत्ता सरकार जमा होवू नये यासाठी या मालमत्तांची विक्री करण्यात आली आणि ती नवाब मलिकांनी खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.
या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी ही दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा फ्रंट मॅन असलेला सलिम पटेल याच्याकडे होती. दाऊद इब्राहीम पाकिस्तानात पळून गेल्यानंतर पॉपर्टी अॅटेच करण्याचे काम हसीना पारकर यांच्या माध्यमातून केले जात होते. त्या सर्व पॉपर्टींची पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल यांच्या नावाने आहे. त्यापैकीच ही पण एक प्रॉपर्टी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी सांगितले.
या जमिनीचा पर चौरस फुट रेट हा ८ हजार रूपये असताना ती केवळ ३० लाख रूपयांना मलिक यांनी खरेदी केली. मात्र त्यापैकी केवळ २० लाख रूपये मलिक यांनी या जमिन खरेदीपोटी दिले. २००५ साली हा व्यवहार झालेला असून या जमिनी यातील अन्य मालकाला किती पैसे दिले याची माहितीच यात नाही. परंतु सलिम पटेल याला १५ लाख रूपये चेकने दिल्याची नोंद यात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय फोनिक्स मॉल येथेही त्यांनी असाच एक व्यवहार केला असून अंडरवर्ल्डशी संबधित असलेल्या माणसाकडून तेथे रेडी रेकनरचा जास्त रेट असताना केवळ २५ रूपये प्रति चौरस फुटाने ती जमिन खरेदी केली आणि ती २ हजार रूपये प्रति दराने विकल्याचा गंभीर आरोपही करत अशा प्रकारचे एकूण ५ व्यवहार मलिक यांनी केलेले असून त्या सर्वांची कागदपत्रे योग्य यंत्रणेला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या व्यवहारासाठी जर काळ्या पैशाचा वापर झालेला असले तर त्याचा शोध केंद्रीय यंत्रणा करतील आणि त्यानुसार त्यावर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *