Breaking News

केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर राज्य सरकारकडून गुन्हे अमेरिका, रशियासह १८ देशाच्या परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल: गृहमंत्री देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना विषाणूचे संकट देशावर घोंघावत असतानाही तब्लीगीसाठी परदेशी नागरिकांना खास हजेरी लावता यावी यासाठी केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर अखेर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे या सर्व परदेशी नागरिकांवर व्हिसा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून यात अमेरिका, रशिया, इराण यासह १८ देशातील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोरोना प्रतिबंध करण्यासाठी राज्यात सर्वत्र लाँकडाऊन सुरू आहे. या काळात पोलिस विभागाने व्हिसा उल्लंघन केल्याप्रकरणी १५६ परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल केला असूनस पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या १५६ विदेशी नागरिकांच्या विरोधात  Foreigner’s Act section 14 B व भा.दं.वि.कलम १८८,२६९,२७० नुसार गुन्हा नोंदविला आहे. मुंबई ,ठाणे ,नवी मुंबई,अमरावती,नांदेड,

नागपुर,पुणे अहमदनगर,चंद्रपुर व गडचिरोली मध्ये हे एकूण १५ गुन्हे नोंदविले आहेत. हे सर्व विदेशी नागरिक पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आले आहेत. ते व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन करून निज़ामुद्दीन, दिल्ली च्या मरकज़ मध्ये सामिल झाल्याचे त्यांनी सांगितले. या परदेशी नागरिकांमध्ये कझाकिस्तान -९, दक्षिण अफ़्रीका -१, बांगलादेश-१३, ब्रूने-४, आयवोरियन्स -९, इराण-१, टोगो-६, म्यांनमार-१८, मलेशिया-८, इंडोनेशिया-३७, बेनिन-१,फ़िलीपीन्स-१०, अमेरिका-१, टांज़ानिया-११, रशिया-२, जिबोती-५, घाना-१, किर्गिस्तान-१९ या देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांना institutional Quarantine मध्ये ठेवलं आहे.

दिल्लीतील मरकज येथील कार्यक्रमातून परतलेल्या लोकांकडून देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. तसेच एका राजकिय पक्षाच्या आयटीसेल कडून विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्व गोष्टीत केंद्र सरकारने मरकजमधील कार्यक्रमाला उपस्थित राहीलेल्या एकाही परदेशी नागरिकावर साधी कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही त्यांचा व्हिसा तपासण्याचे कष्ट घेतले नाहीत.

 

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *