Breaking News

मागासवर्गीय पदोन्नतीच्या खटल्यासाठी वकीलच ठरेना सामाजिक न्याय विभागाकडून धावाधाव तर आदीवासी विभाग सुस्त

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनुसूचीत जाती-जमातीच्या अर्थात एससी आणि एसटी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने निकाल देत रद्दबातल ठरले. या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने धाव घेतली असली तरी ४ जानेवारी २०१८ रोजी न्यायालयात  होणाऱ्या सुणावनी दरम्यान कोणता वकील सरकारची बाजू लढविणार याबाबत अद्याप …

Read More »

समृध्दी महामार्गाच्या भूमिपूजनाची डेडलाईन चुकणार? डिसेंबर महिना संपत आला तरी भूमिपूजनाचा मुहूर्तावर निर्णय नाही

samruddhi समृद्धी महामार्ग

मुंबई : प्रतिनिधी नागपूरला मुंबईशी जोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गाचे भूमिपूजन नियोजित वेळापत्रकानुसार डिसेंबर २०१७ मध्ये करण्यात येत होणार होते. मात्र या प्रकल्पासाठी १०० टक्के जमिन खरेदी झालेली नसल्याने या समृध्दीच्या भूमिपूजनाची डेडलाईन चुकण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. समृध्दी …

Read More »

आता कॉंग्रेसची २८८ मतदारसंघात जनआक्रोश यात्रा काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत यात्रेचा कोल्हापूरात शुमारंभ

मुंबई : प्रतिनिधी गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही त्याची पुन:रावृत्ती करण्याच्या उद्देशाने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा शुमारंभ कोल्हापूरातून नवीन वर्षातील जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असून पाच टप्प्यात ही यात्रा होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी …

Read More »

हिवाळी अधिवेशानंतर भाजपतंर्गत राजकारणातील घडामोडींना वेग मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच पंख छाटण्याच्या कामाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. मात्र अधिवेशनाची सांगता होताच मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत संभावित चेहऱ्यांनी राजकिय वजन खर्ची घालण्यास सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये असूनही राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांना पाठबळ पुरविणाऱ्या राजकिय मंत्री आणि आमदारांच्या पंख छाटणीच्या कामास सुरुवात झाल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय …

Read More »

१६ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवास सुरुवात मराठीबरोबरच इजिप्त, इराण, व्हिएतनाम, तिबेट, तैवान, बांग्लादेशी चित्रपटांची मेजवाणी

मुंबई : प्रतिनिधी एशियन फिल्म फाऊण्डेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ व्या ‘थर्ड आय आशियाई’ चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. याप्रसंगी आशियाई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगांवकर, पु.ल. देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक …

Read More »

राज्यातील गुन्हे वाढले नाहीत तर घटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था खराब झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र राज्यातील खून-१३.४९ टक्के, बलात्कार ३.६ टक्के, दरोडा २.४३ टक्के, सोनसाखळी गुन्ह्यात २.९३ टक्क्याने घट झाली असून फक्त गहाळ वस्तूंच्या तक्रारी चोरी या सदरात घेतल्याने चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्र गुन्ह्याच्या बाबत …

Read More »

खुनाची सुपारी देणाऱ्या नगरसेवकाला राज्यमंत्री वाचवतोय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा गौप्यस्फोट

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून भाजपचा डोंबिवलीचा एक नगरसेवक कल्याणच्या नगरसेवकाचा खून करायची १ कोटी रूपयांची सुपारी देतोय. या नगरसेवकाला वाचविण्यासाठी याच सरकारमधील एक राज्यमंत्री वाचविण्याचा प्रयत्न करतोय असा गौप्यस्फोट करत यावरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. …

Read More »

मुंबईतील आदीवासी पाडे, कोळीवाड्यातील झोपड्यांचे लवकरच पुर्नवसन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे आश्वासन

नागपुर : प्रतिनिधी बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदीवासी पाडे, वन विभागाच्या जागेवरील झोपड्या, कोळीवाड्यांतील झोपड्यांचे लवकरच पुर्नवसन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या मोडकळीस आलेल्या घरांची दुरूत्ती व कामाचा दर्जा याप्रश्नासह दामू नगरचे पुनर्वसनच्या प्रश्नावर राज्याचे वनमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री …

Read More »

महामार्गाचा ठेकेदार न्यायालयात जाण्याच्या भितीने ५४० कोटी दिले सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणारा ठेकेदार हा दिवाळखोरीत निघाला आहे. या परिस्थितीत त्याचा ठेका रद्द केला. तर तो न्यायालयात जाण्याची शक्यता अधिक आहे. केवळ त्या भीतीपोटी त्याचा ठेका रद्द करण्याऐवजी त्यालाच राज्य सरकारकडून ५४० कोटी रूपये देवून खूष करत त्याच्याकडून हा महामार्ग पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे …

Read More »

स्वतंत्र की एकटा ? वपुंच्या कांदबरीवर आधारीत ‘ढाई अक्षर प्रेम के’

मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री मुक्ता बर्वेने अभिनयासोबतच नाट्यनिर्मितीद्वारेही छापा काटा, रंग नवा, लव्हबर्ड्स, कोडमंत्र या नाटकानंतर आता पाचव्या नाट्यनिर्मितीसाठी सज्ज झाली आहे. मुक्ताच्याच दीपस्तंभ तसंच CODE मंत्र या नाटकातून अभिनय करणाऱ्या सुजाता मराठे या नाटकाद्वारे प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. दिनू पेडणेकर या नाटकाचे निर्मिती सूत्रधार आहेत. ९ नोव्हेंबरला …

Read More »