Breaking News

अभिनेते मोहन जोशी यांची दांडी गुल नाट्य परिषदेच्या निवडणुकीतील उत्सुकता वाढली

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पड़घम वाजु लागले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाट्यकर्मिंची यादी जाहिर झाली आहे. या यादीत नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांचा अर्ज अपात्र ठरल्याने या निवडणुकीतून त्यांची दांडी गुल झाली आहे. मुंबई विभागातुन एकूण ३६ जणांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरले होते. …

Read More »

कर्करोगावर सातत्याने नवे संशोधन होत राहणे गरजेचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी वैद्यकशास्त्रात पदवी घेतलेल्या संशोधकांनी कर्करोग क्षेत्रात सातत्याने संशोधन करीत राहणे आवश्यक आहे. मात्र या अनुषंगाने प्राचीन आयुर्वेदामधून काही पर्यायी उपाय मिळू शकतात का यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त करत कर्करोगावर स्वदेशी आणि परवडणारे उपायांच्या अनुषंगाने संशोधन करावे अशी सूचनाही त्यांनी …

Read More »

वर्षा उसगांवकर प्रथमच कोंकणी चित्रपटात दिसणार सासूबाई वर्षा आणि जावयाची जुगलबंदी पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी आपल्या मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, पण मनाजोगती कथा आणि व्यक्तिरेखा न मिळाल्याने काही कलाकार त्यापासून दूर राहणंचं पसंत करतात. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीपासून प्रादेशिक चित्रपटसृष्टीपर्यत सर्वच ठिकाणी वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरलेले असे कलाकार मातृभाषेतील चित्रपटात कधीच दिसत नाहीत. मराठीसोबतच हिंदीतही अभिनय …

Read More »

सरकारकडून फक्त २५ टक्क्याच्या निधीवर जनतेची बोळवण विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकास कामांसाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तरतुदीप्रमाणे विविध विभागांना राज्य सरकारने आजवर अर्थसंकल्पीय तरतुदींच्या ३५ ते ४० टक्के निधी उपलब्ध करून दिला नाही. फक्त २५ टक्क्यांच्या निधीवर कल्याणकारी योजना आणि लाभार्थी जनतेची बोळवण केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. हे सरकार सातत्याने आर्थिक शिस्तींचे …

Read More »

राज्यातील भाजपचे सरकार सर्वसामान्यांचे नव्हे तर धनिकांचे ‘पतंजली’बाबतचे परिपत्रक तातडीने रद्द करण्याची विखे पाटील यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजपचे सरकार हे सर्वसामान्यांचे नसून मूठभर धनिकांचे आहे. त्यामुळेच मुठभर धनिकांच्या फायद्यासाठी अर्थात पंतजलीची उत्पादने विकण्यासंदर्भात राज्य सरकारने शासकीय सेवा क्रेंद्रातून उत्पादने विकण्याचा निर्णय घेण्याची कृती हे स्पष्ट दर्शवित असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत ते परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली. हे सरकार सर्वसामान्यांचे नसून, …

Read More »

रणवीर सिंह नॅान-स्टॅाप १२-१२ तासाच्या शिफ्टमध्ये सतत करतोय काम

मुंबई : प्रतिनिधी काही कलाकार आपल्या कामाप्रती इतके प्रामाणिक असतात की, त्यांच्यासाठी कामापुढे इतर सर्व गोष्टी गौण ठरतात. २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंगही याला अपवाद नाही. कठोर आणि अविरत मेहनत हे रणवीरने भारतीय चित्रपटसृष्टीत घेतलेल्या गरुडभरारीच्या …

Read More »

राज्य सरकारकडून विकासकामांवर फक्त ४३ टक्के निधी खर्च गेल्या दोन वर्षापेक्षा ८ टक्के कमी निधीचा खर्च

मुंबई: गिरिराज सावंत राज्य सरकारकडून राज्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, शेती क्षेत्र यासह विविध क्षेत्रात विकास कामांच्या घोषणांचा धडका लावलेला आहे. मात्र एकाबाजूला विकास कामांच्या घोषणांचा धडका लावलेला असताना प्रत्यक्षात विकास कामांवर मंजूर अर्थसंकल्पातील निधीपैकी फक्त ४३ टक्के निधी खर्च केला असून मागील दोन वर्षापेक्षा सर्वात कमी निधी खर्च केला असल्याची …

Read More »

२०१९ हे वर्ष भाजपच्या घर वापसीचे : खा. अशोक चव्हाण काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिराची मनोर पासून सुरुवात

मनोर : प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष असून २०१९ हे वर्ष काँग्रेसचे राहणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करत हेच वर्ष भाजपच्या घर वापसीचे राहणार असल्याची भविष्यवाणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत केंद्र आणि राज्यातील परिवर्तनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. पालघर जिल्ह्यातील …

Read More »

महाराष्ट्र बंद नंतर दलित समाजाकडून राजकिय अस्तित्वासाठी प्रयत्न नवे नेतृत्व पुढे करण्याच्या हालचालींना वेग

मुंबई : प्रतिनिधी मागील काही वर्षापासून दलित नेत्यांच्या गटाला मुठमाती देवून एका समर्थ राजकिय पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रातील दलित सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र तुकड्यामध्ये विभागलेल्या राजकिय पक्षाच्या गटांच्या नेत्यांना त्यामध्ये फारसे स्वारस्य वाटले नाही. त्यामुळे ऐक्याची दिलेली हाक हवेतच विरली. मात्र कोरेंगाव भिमा येथील घडलेल्या घटनेनंतर …

Read More »

सुप्रिया गाणार साईबाबांचे गुणगान सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत सुप्रियाही बनली गायिका

मुंबई: प्रतिनिधी सुप्रिया पिळगावकर हे नाव छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना चांगलंच परिचयाचं आहे. सहजसुंदर अभिनय कौशल्याच्या बळावर सुप्रिया यांनी छोट्या पडद्यावरील चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘क्षितीज ये नहीं’, ‘तू तू मैं मैं’, ‘कभी बीवी कभी जासूस’, ‘तू तोता मैं मैना’, ‘कडवी खट्टी मीठी’, ‘राधा की बेटियां कुछ …

Read More »