Breaking News

वर्षा उसगांवकर प्रथमच कोंकणी चित्रपटात दिसणार सासूबाई वर्षा आणि जावयाची जुगलबंदी पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी

आपल्या मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, पण मनाजोगती कथा आणि व्यक्तिरेखा न मिळाल्याने काही कलाकार त्यापासून दूर राहणंचं पसंत करतात. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीपासून प्रादेशिक चित्रपटसृष्टीपर्यत सर्वच ठिकाणी वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरलेले असे कलाकार मातृभाषेतील चित्रपटात कधीच दिसत नाहीत. मराठीसोबतच हिंदीतही अभिनय करणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकरांबाबतही असंच काहीसं घडलंय. वर्षा उसगावकर कोंकणी आहेत. कोंकणी असूनही आजवर त्या कधीही कोंकणी चित्रपटात दिसल्या नाहीत. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीला कोंकणी चित्रपटात पाहण्याची वर्षा उसगावकर यांच्या चाहत्यांची इच्छा आजवर अधुरीच राहिली होती, पण लवकरच त्या एका कोंकणी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत असून  त्या चित्रपटाचे नाव ‘ नं. १’  वरून असल्याचे सांगण्यात येत आहे.

या  कोंकणी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक हॅरी फर्नांडीस हे करणार असल्यांचे सांगण्यात येत  असून हा चित्रपट सासू आणि जावई यांच्या  अनोख्या जुगलबंदीवर आधारीत असणार आहे. वर्षा उसगावकर या मूळच्या गोव्याच्या आहेत. पण त्या कायम मराठी चित्रपटसृष्टीतच रमल्या. ‘खलनायिका’ या हिंदी चित्रपटातील चोली गीतामुळे त्या हिंदी सिनेसृष्टीत अल्पावधीत प्रकाशझोतात आल्या. असं असलं तरी कोंकणी असूनही वर्षा यांनी आपल्या मातृभाषेत सिनेमा न केल्याची खंत कोंकाणी भाषिकांना होती.  आपणही एखाद्या कोंकणी सिनेमात काम करावं असं वर्षा उसगावकर यांनाही वाटत होतं, परंतु एखाद्या चांगल्या स्क्रीप्टच्या तसंच व्यक्तिरेखेच्या प्रतिक्षेत त्या होत्या. अखेर या चित्रपटाची कथा वर्षा यांना भावल्याने त्या कोंकणी चित्रपटात दिसणार असल्याचं समजतं. या चित्रपटातील भूमिकेसाठी वर्षा यांचा गेटअपही बदलण्यात आला आहे. त्यामुळे मातृाभाषेतील चित्रपटात वर्षा एका नव्या लुकमध्ये दिसणार यात शंका नाही. या चित्रपटात वर्षा यांच्या जोडीला कोंकणी भाषेतील काही नामवंत कलाकार आहेत. ९० च्या दशकात मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणाऱ्या वर्षा उत्तम नृत्यांगना असून कोंकणी चित्रपटात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात का ते पाहायचं आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *