Breaking News

रणवीर सिंह नॅान-स्टॅाप १२-१२ तासाच्या शिफ्टमध्ये सतत करतोय काम

मुंबई : प्रतिनिधी

काही कलाकार आपल्या कामाप्रती इतके प्रामाणिक असतात की, त्यांच्यासाठी कामापुढे इतर सर्व गोष्टी गौण ठरतात. २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंगही याला अपवाद नाही. कठोर आणि अविरत मेहनत हे रणवीरने भारतीय चित्रपटसृष्टीत घेतलेल्या गरुडभरारीच्या यशाचं गमक आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

एकीकडे ‘पद्मावत’मुळे तर दुसरीकडे ‘गल्ली बॅाय’ या आगामी चित्रपटामुळे रणवीर लाइमलाईटमध्ये आहे. रणवीरने ‘पद्मावत’नंतर ‘गल्ली बॅाय’साठी केलेलं बॅाडी ट्रान्स्फॅार्मेशनबाबत एव्हाना सर्वांनाच ठाऊक झालं असेल. यासाठी त्याने घेतलेली मेहनतही पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हाच रणवीर सध्या दिग्दर्शिका झोया अख्तरच्या ‘गल्ली बॅाय’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. चित्रीकरणात तो इतका व्यग्र आहे की त्याच्याकडे आराम करायलाही वेळ नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असं समजतं की, रणवीर आजही दिवसातील २४ तास नॅान-स्टॅाप काम करतोय. ‘गल्ली बॅाय’साठी रणवीरने सलग १२ तास चित्रीकरण केलं. त्यानंतर पुढील १२ तासांमध्ये त्याने एका जाहिरातीचं शूट पूर्ण केलं. इतकंच नव्हे तर जाहिरातीचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरही तो थांबला नाही, तर नंतरचे १४ तास अन्य एका कामात बिझी होणार होता. याचा अर्थ २४ तासच नव्हे तर जवळजवळ दोन दिवस नॅान-स्टॅाप काम करत होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणवीरने मुंबईतील धारावीमध्ये ‘गल्ली बॅाय’चं शूटिंग केलं. ते पूर्ण होताच त्याने थेट जाहिरातीच्या शूटिंगसाठी दुसरा सेट गाठला. उत्पादन कंपनीच्या दृष्टिने ही जाहिरात अत्यंत महत्त्वाची असून, जाहिरात कंपनीला लवकरात लवकर पूर्ण करून लाँच करायची होती. त्यामुळे रणवीरनेही विश्रांतीचा विचार न करता सलग शूट केलं. रणवीरची हि जिद्द आणि चिकाटी अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या तरुणाईला मार्गदर्शक ठरणारी आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *