Breaking News

३०० हून अधिक कक्ष अधिकाऱ्यांचा सहसचिव होण्याचा मार्ग मोकळा उच्च न्यायालयाच्या निकालाने थेट भरती झालेल्यांना दिलासा

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात थेट भरतीतून नोकरीस लागलेल्या असंख्य कक्ष अधिकाऱ्यांना पात्रता असूनही केवळ सेवा ज्येष्ठता आणि पदोन्नतीतून पुढे येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे लवकर पदोन्नती मिळत नव्हती. त्यामुळे मंत्रालयात थेट भरती झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याबाबत निर्णय घेत थेट कक्ष अधिकारी …

Read More »

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी ब्रिटीश कंपनी उत्सुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूकीला १०० टक्के परवानगी दिल्याने महाराष्ट्रात  संरक्षणविषयक उत्पादनांची निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी ब्रिटीश कंपनी बीएई सिस्टीम्सने अनुकुलता दर्शविली आहे. तसेच यासाठी लागणारे आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएई …

Read More »

शिवसेना बदलतेय…? राष्ट्रीय कार्यकारणीचे आयोजन आणि माध्यमांना खुला प्रवेश

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात नेहमीच कुतुहल शिवसेनेबाबत आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा सोडला तर आतापर्यत एकाही पक्ष संघटनेच्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांना खुले आमंत्रण नव्हते. मात्र यावेळी राष्ट्रीय कार्यकारणीच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच प्रसार माध्यमांना खुला प्रवेश देत शिवसेनेत सारे काही (आर) पारदर्शक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाल्याने शिवसेना बदलतेय का? असा प्रश्न शिवसैनिकांबरोबर सर्वसामान्यांच्या मनात …

Read More »

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात २९ जानेवारीपासून आंदोलन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जात आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची लूट सुरु असून काँग्रेस पक्ष या दरवाढीविरोधात २९, ३०, ३१ जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे माजी …

Read More »

तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी १५ दिवसात मंडळ स्थापनार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी समाजाच्या मुख्य प्रवाहात ज्या पध्दतीने स्त्री-पुरूषांना सन्मानाने जगता येते. त्याच पध्दतीने तृतीयपंथीयांनाही सन्माने जगता यावे याकरिता तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्याची घोषणा सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज केली. राज्य सरकारने तृतीयपंथी व्यक्तींचा विकासासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी स्वतंत्र कल्याण मंडळ …

Read More »

स्वबळाची घोषणा केली तरी ते सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा सरकारमधील सहभागी पक्ष असलेल्या शिवसेनेने जरी केली. तरीही ते सत्तेतून बाहेर पडणार नसल्याची टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका होण्यास आणखी वर्ष दिड वर्षाचा कालावधीचा अवकाश असताना भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह डाव्या पक्षांनी …

Read More »

उद्योगांना चालना देण्यासाठी फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहीती

मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे दिली. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-२०१८ मध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे …

Read More »

आदीत्य ठाकरे यांच्यासह शिंदे, खैरे, आडसूळ, गीते यांना बढती मिलिंद नार्वेकर नवे सचिव तर परब, कायदे नवे प्रवक्ते

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने शिवसेनेनेही नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्यासह युवा सेनेचे प्रमुख आदीत्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेते पदी बढती दिली. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून …

Read More »

महाराष्ट्र विधानसभेवर शिवसेना स्वबळावर भगवा फडकविणार राज्यासह देशभरात निवडणूका लढविण्याची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील काही वर्षे केवळ हिंदू मतांमध्ये फाटाफूट नको म्हणून शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर निवडणूका लढवित नव्हती. मात्र यापुढील काळात महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक निवडणूक शिवसेना लढविणार असून त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन करत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका स्वबळावर लढवित महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविणार असल्याची घोषणा शिवसेना …

Read More »

सेन्सेक्स ३६ तर निफ्टी ११ हजारांच्या वर सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

मुंबई: प्रतिनिधी देशातील शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून तेजी असून सेन्सेक्स, निफ्टी रोज नवीन विक्रम करत आहे. मंगळवारी सेन्सेक्सने प्रथमच ३६ हजारांचा टप्पा ओलांडून आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. तर निफ्टीही प्रथमच ११ हजारांच्या वर गेला आहे. परकीय आणि देशातील गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या जोरदार खरेदीमुळे शेअर बाजाराने विक्रम केला आहे. सेन्सेक्स …

Read More »