Breaking News

सेन्सेक्स ३६ तर निफ्टी ११ हजारांच्या वर सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

मुंबई: प्रतिनिधी

देशातील शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून तेजी असून सेन्सेक्स, निफ्टी रोज नवीन विक्रम करत आहे. मंगळवारी सेन्सेक्सने प्रथमच ३६ हजारांचा टप्पा ओलांडून आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. तर निफ्टीही प्रथमच ११ हजारांच्या वर गेला आहे.
परकीय आणि देशातील गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या जोरदार खरेदीमुळे शेअर बाजाराने विक्रम केला आहे. सेन्सेक्स ७० अंकाने वधारून २५ हजार ८६८ अंकावर उघडला. त्यानंतर सेन्सेक्सने काही वेळातच ३६ हजाराची पातळी ओलांडली. तर निफ्टीही ३१ अंकाने वाढून १० हजार ९९७ वर उघडला. लार्जकॅप शेअर्सबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मंगळवारी मोठी खरेदी दिसून आली.
परकीय गुंतवणूकदार परतले
मागील वर्षातील शेवटच्या पाच महिन्यात सातत्याने विक्री करत असलेले परकीय गुंतवणूकदार अाता भारतीय शेअर बाजारात परतले आहेत. जानेवारी महिन्यात १६ दिवसात परकीय गुंतवणूकदारांनी ६ हजार ५६५ कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आहेत. दर देशातील गुंतवणूकदारांची या कालावधीत २८६ कोटींची गुंतवणूक राहिली आहे. सरकारी बँकांच्या पुर्नभांडवलाची योजना, अर्थव्यवस्थेची चांगली परिस्थिती, कंपन्यांचे चांगले तिमाही निकाल आणि अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची आशा असल्याने शेअऱ बाजारात गुंतवणूक वाढली आहे.

Check Also

डिजीटल पेमेंट्स सुविधेसाठी नामिबिया आणि एनपीसीआयमध्ये करार

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 2 मे रोजी सांगितले की, नामिबियासाठी युनिफाइड पेमेंट्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *