Breaking News

आदीत्य ठाकरे यांच्यासह शिंदे, खैरे, आडसूळ, गीते यांना बढती मिलिंद नार्वेकर नवे सचिव तर परब, कायदे नवे प्रवक्ते

मुंबई : प्रतिनिधी

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने शिवसेनेनेही नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्यासह युवा सेनेचे प्रमुख आदीत्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेते पदी बढती दिली. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांना थेट शिवसेनेच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वरळी येथील एनसीआयमधील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली.

सद्यपरिस्थितीत शिवसेनेचे ७ नेते होते. मात्र आता एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, अनंत गीते आणि आदीत्य ठाकरे या पाच जणांना बढती दिल्याने शिवसेनेच्या नेत्यांची संख्या १३ वर पोहचली आहे.

याबरोबरच शिवसेनेच्या सचिव पदी मिलिंद नार्वेकर यांच्यासह सूरज चव्हाण यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रवक्ते पदी अनिल परब, अरविंद सावंत, आमदार नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे याची नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

याबरोबरच राज्यातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका स्वतंत्रपणे लढविण्याबाबतचा ठराव खासदार संजय राऊत यांनी मेळाव्यात मांडला. त्यास सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने पाठिंबा दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *