Breaking News

केंद्राच्या धर्तीवर आता स्वच्छतेसाठी वार्डांनाही मिळणार लाखोंची बक्षिसे स्वच्छ वार्ड स्पर्धेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या स्वच्छ शहरांच्या धर्तीवर राज्यातही शहरांमधील वार्डांची स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून येत्या १ जानेवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१८  या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धेतील महापालिका वार्ड विजेत्यांना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख आणि २० लाखाचे बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या शहरांच्या …

Read More »

नववर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करा सेल्फी कॉर्नर व पथनाट्य गीतांच्या माध्यमातून प्रकटविणार व्यसनाचे विरादक रूप

मुंबईः प्रतिनिधी समाजामध्ये वाढणारी व्यसनाधिनता खूपच भनायक रूप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे.यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. उद्याच्या पिढीला आरोग्य संपन्न,सुदृढ व व्यसनमुक्त ठेऊन शक्तीशाली राष्ट्र घडविण्याचे आपले कर्तव्य आहे. याकरीता नविन वर्षाची सुरूवात आपल्या संस्कृतीनूसार आनंदाने,उत्साहाने आणि संकल्प ठेऊन करतो.मात्र नविन वर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे …

Read More »

मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राबाबत मुख्यमंत्र्यांचा राज्यद्रोह कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी देशासह राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नियोजित आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र स्थापन करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम आणि जाणीवपूर्वक चालढकल केली. तसेच हे केंद्र गुजरातला जाण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत केल्याची टीका करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत मुख्यमंत्र्यांनी राज्य द्रोह केल्याचा आरोप केला. नरिमन पाँईट येथील विरोधी …

Read More »

भाजप नेत्यांच्या समृध्दीचा मार्ग म्हणजे समृध्दी महामार्ग राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मुंबईला नागपूरला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्प हा सर्वात मोठा घोटाळा असून हा महामार्ग म्हणजे भाजप नेत्यांच्या समृद्धीचा मार्ग असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करत महामार्गाच्या माध्यमातून पैसे उकळण्याचे काम केलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना तेथेच नियुक्ती देत भ्रष्टाचार सुरु ठेवण्यासाठीच त्यांची नियुक्ती …

Read More »

मुख्यमंत्र्यांची सही न झाल्याने सामाजिक न्याय विभागाचा पुरस्कार सोहळा रद्द पुरस्कारप्राप्त यादीला मान्यता न मिळाल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळ

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मागासवर्गीयांसाठी विविध पातळीवर काम करणाऱ्या नागरीकांचा राज्य सरकारकडून यथोचित मान-सन्मान व्हावा यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून पुरस्काराचे वितरण करण्यात येते. मात्र यंदाच्या वर्षी संभावित पुरस्कार प्राप्त यादीला अखेरच्या क्षणापर्यत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता न मिळाल्यामुळे २ डिसेंबर २०१७ रोजीचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची पाळी सामाजिक न्याय विभागावर …

Read More »

नवीन वर्षात पीपीएफ, लहान योजनांवर मिळणार कमी व्याज ०.२० टक्क्याने केली कपात

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारने लहान बचत योजनांवरील व्याजदरात ०.२० टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या जानेवारी – मार्च तिमाहीत पोस्टातील लहान बचत योजनांवर कमी व्याज मिळणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेवरीलही व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहेत. …

Read More »

वर्ष २०१७ मध्ये सेन्सेक्सने नोंदवली २८ टक्क्यांनी वाढ २६ हजारावर असलेला निर्देशांक वर्षअखेर ३४ हजारावर

मुंबईः नवनाथ भोसले वर्ष २०१७ हे शेअर बाजारासाठी खूपच चांगले राहिले आहे. या वर्षी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांने प्रथमच ३४ हजारांची पातळी ओलांडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १० हजार ५०० च्या वर पोहोचला. सेन्सेक्स १ जानेवारी२०१७ या दिवशी २६ हजार ५९५.४५ अंकांवर होता. तर २७ डिसेंबर २०१७ ला …

Read More »

क्लीन चीट देणाऱ्या सरकारकडून मोपलवारांची चौकशी म्हणजे फार्सच विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी भूखंडप्रकरणी वादग्रस्त ठरलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची घोषणा जरी राज्य सरकारने केली. तरी पहिल्या दिवसांपासून त्यांना क्लीन चीट देण्याच्या दिशेनेच सरकारची पावले पडत होती असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत मोपलवार यांची चौकशी फक्त फार्सच असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण …

Read More »

‘ओढ’ चित्रपटाच्या संगीताचे अनावरण

मुंबई: प्रतिनिधी मैत्रीचे वेगळे रूप दाखविणारा ‘ओढ’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मराठी चित्रपटाच्या संगीताचा अनावरण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलर व गीताची झलक दाखवण्यात आली. कलाकारांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसंच एस. आर. तोवर …

Read More »

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता हिवाळ्यात ? केंद्राच्या निर्णयानंतर लगेच राज्य सरकारही निर्णय घेणार

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष गणले जाते. या कालगणनेनुसारच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र या नेहमीच्या कालगणनेनुसार न जाता राज्याचा अर्थसंकल्प मार्च मध्ये सादर करण्याऐवजी तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत सादर करण्याचा विचार राज्य सरकारचा असल्याची माहिती राज्याचे सांसदीय कार्यमंत्री …

Read More »