Breaking News

‘ओढ’ चित्रपटाच्या संगीताचे अनावरण

मुंबई: प्रतिनिधी मैत्रीचे वेगळे रूप दाखविणारा ‘ओढ’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मराठी चित्रपटाच्या संगीताचा अनावरण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलर व गीताची झलक दाखवण्यात आली. कलाकारांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसंच एस. आर. तोवर …

Read More »

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता हिवाळ्यात ? केंद्राच्या निर्णयानंतर लगेच राज्य सरकारही निर्णय घेणार

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष गणले जाते. या कालगणनेनुसारच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र या नेहमीच्या कालगणनेनुसार न जाता राज्याचा अर्थसंकल्प मार्च मध्ये सादर करण्याऐवजी तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत सादर करण्याचा विचार राज्य सरकारचा असल्याची माहिती राज्याचे सांसदीय कार्यमंत्री …

Read More »

मराठा- जाट आणि पटेलांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास विरोध २७-२८ जानेवारी रोजी शिर्डी येथे ओबीसी जनगणना परिषद

ठाणेः प्रतिनिधी मराठा- जाट आणि पटेलांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, जर ओबीसी आरक्षणामध्ये या तीन समाजाचा समावेश केल्यास सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा भारतीय पिछडा शोषीत संघटनेचे नेते आ. हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, देशात ओबीसींची जनगणना झालेली नाही. त्यामुळे ही जनगणना करण्यात यावी, …

Read More »

समृध्दी महामार्गासाठी आता अंतिम अर्थ पुरवठादाराच्या होकाराची प्रतिक्षा दक्षिण कोरिया कंपनीकडून शेवटची पाहणी पूर्ण

samruddhi समृद्धी महामार्ग

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गाच्या मागे असलेले वित्तीय शुल्क काष्ठ काही केल्या अद्यापही सुटायला तयार नाही. या प्रकल्पासाठी निधी उभारणीचे आव्हान मोठ्या प्रमाणावर असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या प्रकल्पास वित्तीय सहाय करण्यास दोन्ही वेळेस नकार दिल्याने दक्षिण कोरियाच्या आर्थिक मदतीची शेवटची आशा राज्य …

Read More »

बीएसएनएलने आणला अवघ्या ४९९ रुपयांमध्ये फोन

नवी दिल्लीः प्रतिनिधी सरकारी दुरसंचार कंपनी बीएसएनएलने अवघ्या ४९९ रुपयांमध्ये एक नवीन फिचर फोन आणला आहे. बीएसएनएलने मोबाईल हँडसेट तयार करणारी कंपनी डिटेलच्या सहकार्याने हा फोन तयार केला आहे. या फोनवर १ वर्ष व्हॉईस कॉलची ऑफर मिळणार आहे. फोनची घोषणा जयपूरमध्ये करण्यात आली. फोनची मूळ किंमत ३४६ रुपये असून बीएसएनएलने …

Read More »

सरत्या वर्षात म्युच्युअल फंडांनी केले मालामाल ८३ टक्क्यांपर्यंत मिळाला परतावा

मुंबईः नवनाथ भोसले म्युच्युअल फंड उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी २०१७ वर्ष खूपच चांगले गेले अाहे. काही फंडांनी तब्बल ५० टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा दिला आहे. चांगला परतावा मिळाल्यामुळे संपूर्ण वर्षभर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली. नोव्हेंबर २०१७ पर्यंत म्युच्युअल फंडाची संपत्ती वाढून २२.७३ लाख कोटी रुपयांवर गेली. तर नवीन खात्यांची …

Read More »

पदावरून दूर केलेल्या मोपलवार यांची पुन्हा एमएसआरडीसीत नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाचे रजा मंजूर करत पुन्हा रूजू होण्याचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी शहरातील बोरिवली येथील भूखंड स्वस्तदरात विकण्यासंदर्भात आणि बांधकाम व्यावसायिक सतीश मांगले यास धमकाविल्याप्रकरणी एमएसआरडीसीच्या उपाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलेले राधेश्याम मोपलवार यांना पुन्हा सेवेत रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला असताना त्या कालावधीची रजा गृहीत धरून त्यांना …

Read More »

विक्रम गोखलेरूपी भगवं वादळ येणार आरक्षण व राजकारणावर आधारीत ‘राष्ट्र’

मुंबईः प्रतिनिधी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याच कारणामुळे गोखले जेव्हा एखाद्या चित्रपटात दिसणार असतात, तेव्हा त्यांच्या चाहत्यांसोबतच सर्वांच्या नजरा त्या चित्रपटावर खिळतात. लवकरच ते ‘राष्ट्र’ या आरक्षण व राजकारणावर आधारीत आगामी मराठी चित्रपटाद्वारे …

Read More »

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरील कारवाईला मुहूर्त मिळेना ३३ एसआरए प्रकल्पाच्या घोटाळ्यातील महापालिका अभियंता धिवर गायब

मुंबईः प्रतिनिधी शहरातील एसआरएच्या ३३ एसआरए प्रकल्पाच्या घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरील कारवाईचा चेंडू गृहनिर्माण विभागाने एसआरएच्या आखत्यारीत टाकल्याने त्यांच्यावरील कारवाईला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. झोपडीपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या मंजूरीत अनियमितता केल्याप्रकरणी एसआरएचे माजी मुख्याधिकारी तथा माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावर …

Read More »

परकिय गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातून काढता पाय २३ डिसेंबर पर्यंत ७ हजार ३०० कोटी रुपये काढले

नवी दिल्ली : प्रतिनिधी देशाची वित्तीय तूट वाढल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे परकीय गुंतवणूकदारांनी देशातील शेअर बाजारातून काढता पाय घेतला आहे. डिसेंबरमध्ये परकीय गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री होत आहे. या महिन्यात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून ७ हजार ३०० कोटी रुपये काढून घेतले आहेत. नोव्हेंबरमध्ये ८ महिन्यांतील उच्चांकी गुंतवणूक नोव्हेंबरमध्ये …

Read More »