Breaking News

रुपयाची मजबूती सरकारसाठी आव्हानात्मक निर्यातीच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई: प्रतिनिधी मंगळवारी दिवसाचे कामकाज सुरु होताच डॉलरच्या तुलनेत रुपया २० पैशांनी वाढून डॉलरचा दर ६३ रूपये ५० पैशांवर पोहचला. अडीच वर्षातील रूपयाचा हा उच्चांकी भाव आहे. वर्ष २०१८ च्या पहिल्या तिमाहीत रुपया मजबूत राहण्याची आशा असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. तसेच अर्थसंकल्पा पर्य़ंत रुपया ६२ रूपये ८० पैशापर्यत येण्याची शक्यता आहे. …

Read More »

जनता निषेधात तर दलित केंद्रीय मंत्री आत्मचरित्र पुस्तक प्रकाशनात मग्न दलित संघटनांच्या महाराष्ट्र बंदकडे दस्तुरखुद्द केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंची पाठ

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगांव येथे मानवंदना देण्यासाठी गेलेल्या दलित समाजावर काही समाजकंटकानी दगडफेक केली. त्या निषेधार्थ राज्यातील सर्व दलित संघटना, डाव्या पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र दलित समाजातीलच असलेले आणि स्वत:ला दलितांचा नेता म्हणवून घेणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आपल्या आत्म चरित्रात्मक …

Read More »

नागरिकांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र बंदला शांततेत सुरुवात दलित कार्यकर्त्यांकडून वाहन चालक आणि नागरीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद हाकेला राज्यातील बहुतांष ठिकाणी स्थानिक नागरिकांनी ओ देत दैनंदिन कामकाजावर थांबविण्यास सुरुवात केली आहे. या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, विरार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अनेक शाळा आणि एस.टी,बसेस बंद ठेवण्यात …

Read More »

भीमा कोरेगांवप्रकरणी मुंबईत दलित समाजाकडून शांततेत रास्ता रोको उद्या बुधवारी महाराष्ट्र बंद

मुंबईः प्रतिनिधी दलित समाजावर भीमा कोरेगांव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ मुंबईतील विविध ठिकाणी दलित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आणि निदर्शने करत शांततेत बंद पार पाडला. काही ठिकाणी तुरळक वाहनांवर दगडफेकीच्या घटनांचा अपवाद वगळता मुंबईतील बहुतांष भागात बंद शांततेत पार पडला. सकाळीच दलित समाजाचे कार्यकर्त्ये मोठ्या संख्यने रस्त्यांवर येत दुकाने बंद करण्याचे …

Read More »

बंद कारखान्याच्या जमिनीवर घरे बांधण्यास उद्योजकांना मोकळीक राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी महानगरे, शहरांमध्ये बंद पडलेल्या कारखान्यांच्या जमिनीवर आता घरे बांधून रग्गड नफा कमाविण्याचा मार्ग उद्योजकांना झाला असून अशा बंद पडलेल्या औद्योगिक प्रकल्पाच्या जमिनीचा वापर निवासी घरे बांधण्याच्या निर्णयास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे मोठ मोठ्या उद्योगपतींना त्यांच्या कारखान्याच्या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात आज मंत्रालयात …

Read More »

शासकीय महाविद्यालये, रुग्णालयांना दर करारानुसार औषध खरेदीस मुदतवाढ राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mantralay

मुंबईः प्रतिनिधी औषधांचा साठा संपलेल्या किंवा संपुष्टात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित रूग्णालयांना शासनाने विहित केलेल्या अस्तित्त्वातील दर करारानुसार खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली. त्याचबरोबर संपुष्टात आलेल्या औषधी विषयक बाबींच्या खरेदीसाठीच्या दर करारास मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी …

Read More »

भीमा कोरेगांवप्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे मंत्रालयात आंदोलन १८ आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अटक

मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगांवसह चार गांवामध्ये झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यामुळे मंत्रालयाचा संपूर्ण परिसर दणाणून गेल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे साधारणतः १८ कार्यकर्त्ये मंत्रालयात आले. त्यानंतर त्यांनी थेट …

Read More »

समाजविघातक शक्तींचा कुटील राजकीय डाव हाणून पाडा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी भिमा कोरेगांव, वढू बु. सणसवाडी आणि शिक्रापूर येथे मानवंदना देण्यासाठी जमलेल्या दलित बांधवांसोबत झालेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणा-या समाजविघातक शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी नगर ते हिंजवडी दरम्यानच्या २३.५ कि.मी. अंतराच्या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. तसेच या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी दिली. …

Read More »

प्रमुख उद्योगांची कामगिरी चमकदार ६.८ टक्क्यांची वाढ नोंदवली

मुंबईः प्रतिनिधी नोव्हेंबरमध्ये प्रमुख उद्योगांची कामगिरी चमकदार राहिली आहे. या महिन्यात प्रमुख ८ उद्योग क्षेत्रांनी ६.८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ऑक्टोंबरमध्ये उद्योग क्षेत्राच्या वाढीचा दर ५ टक्के होता. ऱिफायनरी, सिमेंट आणि स्टील उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीमुळे प्रमुख उद्योग क्षेत्रांची कामगिरी चांगली राहिली असल्याचे उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले …

Read More »