Breaking News

भीमा कोरेगांवप्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे मंत्रालयात आंदोलन १८ आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अटक

मुंबईः प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगांवसह चार गांवामध्ये झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यामुळे मंत्रालयाचा संपूर्ण परिसर दणाणून गेल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे साधारणतः १८ कार्यकर्त्ये मंत्रालयात आले. त्यानंतर त्यांनी थेट सहावा मजला गाठत मुख्यमंत्र्याच्या कार्यालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, चलेजाव चलेजाव भाजप सरकार चलेजाव आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

त्यामुळे मंत्रालयातील पोलिसांची एकच धावपळ उडाली. या घोषणेच्या आवाजाने संपूर्ण मंत्रालयाचा परिसर दणाणून गेल्याने आपआपल्या दालनात काम करत असलेले सर्व शासकिय कर्मचारी मजल्याच्या व्हरांड्यात येवून पाहू लागले. दरम्यान मुख्यमंत्री आपल्या दालनात नसल्याने पोलिसांची फारशी वर्दळ सहाव्या मजल्यावर नव्हती. मात्र आंदोलनकर्त्यांच्या या घोषणाबाजीमुळे मंत्रालयात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

अखेर पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात नेले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *