Breaking News

परकिय गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातून काढता पाय २३ डिसेंबर पर्यंत ७ हजार ३०० कोटी रुपये काढले

नवी दिल्ली : प्रतिनिधी

देशाची वित्तीय तूट वाढल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे परकीय गुंतवणूकदारांनी देशातील शेअर बाजारातून काढता पाय घेतला आहे. डिसेंबरमध्ये परकीय गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री होत आहे. या महिन्यात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून ७ हजार ३०० कोटी रुपये काढून घेतले आहेत.

नोव्हेंबरमध्ये ८ महिन्यांतील उच्चांकी गुंतवणूक

नोव्हेंबरमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी बाजारातील आपली गुंतवणूक वाढवली होती. त्यामुळे हा महिना शेअर बाजारासाठी चांगला गेला होता. बँकांमध्ये सरकारने भांडवल ओतल्यानंतर या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात मोठी खरेदी केली होती. नोव्हेंबरमध्ये परकीय गुंतवणूक संस्थांनी (एफपीआय) बाजारात १९ हजार ७२८ कोटी रुपये गुंतवले. मार्च २०१७ नंतरची ही सर्वात मोठी गुंतवणूक होती. मार्चमध्ये परकीय गुंतवणूकदारांची एकूण गुंतवणूक ३० हजार ९०६ कोटी रुपये होती.

आकडेवारीनुसार, देशाची वित्तीय तूट वाढत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचेही दर वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता आहे. तर दुसरीकडे रुपया सातत्याने मजूबत होत असल्याने आणि देशांतर्गत पातळीवर वाढत असलेल्या गुंतवणूकीमुळे परकीय गुंतवणूकदारांना प्रॉफिट बुकिंगची संधी मिळत आहे.

ऑक्टोंबरमध्ये देशाची वित्तीय तूट संपूर्ण वर्षाच्या ठेवलेल्या लक्ष्याच्या ९६.१ टक्क्यांवर पोचली होती. त्यामुळे सप्टेंबरच्या तिमाहीत जीडीपी वाढ घटण्याची शक्यता आहे. तर कच्च्या तेलाचे भाव प्रती बॅरल ६५ डॉलरच्या आसपास असून हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Check Also

हिंदूस्थान युनिलिव्हर लिमिटेडकडून डिव्हीडंड जाहिर नफा २ टक्क्याने घसरला

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने बुधवारी चौथ्या तिमाहीत (Q4 FY24) नफ्यात घट नोंदवली. “(मार्च २०२४) तिमाहीत रु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *