Breaking News

नववर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करा सेल्फी कॉर्नर व पथनाट्य गीतांच्या माध्यमातून प्रकटविणार व्यसनाचे विरादक रूप

मुंबईः प्रतिनिधी

समाजामध्ये वाढणारी व्यसनाधिनता खूपच भनायक रूप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे.यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. उद्याच्या पिढीला आरोग्य संपन्न,सुदृढ व व्यसनमुक्त ठेऊन शक्तीशाली राष्ट्र घडविण्याचे आपले कर्तव्य आहे. याकरीता नविन वर्षाची सुरूवात आपल्या संस्कृतीनूसार आनंदाने,उत्साहाने आणि संकल्प ठेऊन करतो.मात्र नविन वर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करूया असा प्राण्यांचा व्यसनमुक्तीचा संदेश महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्यावतीने उद्या सिएसटी  स्थानकासमोर उद्या २९ तारखेला दिला जाणार आहे.

३१ डिसेंबर या दिवशी अनेक तरूण स्वताच्या सुंदर आरोग्यमय जीवनाला काळींबा फासतात तर वर्षाचा अखेरचा दिवस व्यसनामुळे अनेकांच्या जीवनात अखेरचा ठरतो हे खेदजनक आहे.या करीता नववर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करूया. ३१ डिसेंबर या दिवशी अनेकजण व्यसन करणारे व पहिल्यांदा व्यसनाची चव चाखणारे असतात. या करीता समाजात विशेषता युवकामध्ये जागृती व्हावी.या उद्देशाने राज्य नशाबंदी मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी,सलाम मुंबई व आयना यांच्या अंतर्गत असलेल्या संस्था संघटनांचा सहभाग असून यावेळी व्यसनमुक्तीच्या प्रचार पत्रकाचे वाटप करण्यात करण्यात येणार आहे तर नववर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करा असे आवाहन प्राण्यांच्या माध्यमातून जनतेला करणार असल्याचे नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले आहे.

 

Check Also

टायगर ३’ने पहिल्याच दिवशी मोडला ‘गदर २’चा रेकॉर्ड

अभिनेता सलमान खानने यंदाच्या दिवाळीत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. दिवाळीच्या मुहुर्तावर सलमानचा ‘टायगर ३’ प्रेक्षकांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *