Breaking News

नव्याने कर्ज घेणाऱ्यासाठी एसबीआयकडून नव्या वर्षाची भेट कर्जावरील व्याजदरात कपात

मुंबईः प्रतिनिधी नव्या वर्षात नागरीकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने कर्जधारकांसाठी खास भेट आणली आहे. या भेटीच्या माध्यमातून कर्जासाठी ईएमआय घटणार आहे. एसबीआयने आपला कर्जाचा आधार दर (बेस रेट) ०.३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतल्याने गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज .३० टक्क्याने स्वस्त …

Read More »

भीमा कोरेगांव येथे समाजकंटकाकडून दलितांवर दगडफेक परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त; परिस्थिती तणावपूर्ण

पुणेः प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी जमलेल्या दलित समुदायांवर सकाळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात थोरल्या बाजीरावांनंतरचा पेशवाईचा काळ हा काळा इतिहास म्हणून ओळखला जातो. त्यावेळच्या प्रथा, परंपरांच्या विरोधात …

Read More »

दुसऱ्याच्या घरबांधणीसाठी राबणाऱ्यालाही मिळणार हक्काचे घर ५० हजार घरे बांधण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बांधकाम क्षेत्रासह असंघटीत कामगारांकडून दुसऱ्यांच्या घराच्या निर्मितीसाठी मेहनत घेत असतात. त्या बदल्यात त्यांना वेतनही मिळते. मात्र ते अत्यंत तुटपुज्या स्वरूपात मिळत असल्याने आणि त्यांच्या कामाची कोणतीही शाश्वती नसल्याने अशा बांधकाम क्षेत्रासह असंघटीत कामगारांना हक्काची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या घरांसाठी उन्हातान्हात काम करणाऱ्यांच्या …

Read More »

कार घ्यायचीय ? भरा फक्त मासिक पाच हजार बँकांची स्वस्त कार योजना

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक मध्यमवर्गीयांचे स्वत:च्या मालकीची कार घेण्याचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरण्याचे स्थिती जवळ आली असून फक्त ५ हजार रूपयांच्या मासिक ईएमआयवर कार घेणे सोपे झाले आहे. सद्या बाजारात मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या अनेक कार आहेत. यासाठी फक्त १ ते २ लाख रुपये डाऊन पेमेंट करून मासिक ५ हजार रूपयांच्या …

Read More »

वर्ष अखेरीस राज्यात कर्ज काढून ३ लाख ४१ हजार कोटींची विकास कामे सर्वाधिक कामे मुंबई आणि ठाणे शहरात

मुंबई : गिरिराज सावंत राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांच्या घोषणेचा एकच धडका लावला. या घोषणेनुसार राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये ३ लाख ४१ हजार ४९०.५१ कोटी रूपयांची कामे हाती घेण्यात आली …

Read More »

आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता इराणच्या ‘बर्थ डे नाईट’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा बहुमान

मुंबई : प्रतिनिधी वैविध्यपूर्ण चित्रपट व लघुपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. सत्यजित रे यांचा ‘जनअरण्य’ चित्रपट यावेळी दाखविण्यात आला. द.भा.सामंत लिखित ‘चंदेरी स्मृतिचित्रे’ या पुस्तकाचे आणि व्ही. शांताराम लिखित व मधुरा जसराज संकलित ‘शांतारामा’ या ई-बुकचे प्रकाशनही …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अॅट्रॉसिटी’चित्रपटाचे संगीत प्रकाशन २ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : प्रतिनिधी काही चित्रपट रंजनासोबत समाजातील वास्तव, व्यंग अतिशय परिणामकारक पद्धतीने दाखवीत असतात. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातही प्रेक्षकांना अशाच प्रकारचे ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे. गीत-संगीताचा सुमधूर साज लेऊन अॅट्रॉसिटी अॅक्ट मागील सत्य ‘अॅट्रॉसिटी’या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांचे दिमाखदार प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

कॅन्सर व हृदयरोग रुग्णांना मिळणार स्वस्त दरात औषधे केंद्राची आऊटलेट फार्मसी नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये

Medical Expense

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या एचएलएल लाईफ केअर लिमिटेड मार्फत देशातील कॅन्सर व हृद्यरोग आजाराने ग्रस्त असलेल्या नागरीकांना स्वस्त दरात औषधे मिळावीत यासाठी स्थानिक पातळीवर आऊटलेट फार्मसी सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे या फार्मसी सुरु करण्यात येणार असून या फार्मसीमध्ये बाजारभावापेक्षा स्वस्त दरात औषधे मिळणार …

Read More »

कंपन्या आणि शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी सरते वर्ष अच्छे वर्ष वर्षभरात कंपन्याचे भागभांडवल ४५ लाख ५० हजार कोटींनी वाढले

मुंबईः नवनाथ भोसले भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी २०१७ हे वर्ष खास गेले आहे. या वर्षी गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल ४५.५ लाख कोटी रुपये वाढली आहे. अनेक कंपन्यांनी छप्पर फाडके परतावा दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. सरत्या वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टीने २८ टक्क्यांनी जोरदार वाढ नोंदवली आहे. त्याचबरोबर मुंबई शेअऱ बाजारातील लिस्टेड (नोंदणीकृत) …

Read More »

खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीच्या रिक्त जागा भरा पण तात्पुरत्या राज्य सरकारचे सर्व विभागांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त, मागासवर्ग, इतर मागासवर्ग आदीं प्रवर्गाच्या पदोन्नतीतील जागा भरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. मात्र या पदोन्नतीच्या जागांमधील खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या रिक्त जागा भरून घेण्याचे मात्र तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभांगाना नुकतेच दिले. राज्य सरकारच्या विविध विभागांमधील …

Read More »