Breaking News

नव्याने कर्ज घेणाऱ्यासाठी एसबीआयकडून नव्या वर्षाची भेट कर्जावरील व्याजदरात कपात

मुंबईः प्रतिनिधी

नव्या वर्षात नागरीकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने कर्जधारकांसाठी खास भेट आणली आहे. या भेटीच्या माध्यमातून कर्जासाठी ईएमआय घटणार आहे. एसबीआयने आपला कर्जाचा आधार दर (बेस रेट) ०.३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतल्याने गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज .३० टक्क्याने स्वस्त होणार आहे.

सद्यस्थितीत एसबीआयकडून गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याजाचा दर ८.९५ टक्के असून यात ०.३० टक्क्याने घट केल्याने यावरील व्याजाचा दर ८.६५ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे हे नवीन व्याज दर आज १ जानेवारी २०१८ पासून एसबीआयने लागू केल्याने यापूर्वी कर्ज घेतलेल्यांसाठी आणि नव्याने कर्ज घेणाऱ्यासाठी स्वस्त व्याज दराचा लाभ मिळणार आहे.

१ एप्रिल २०१६ नंतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळणार नाही. याचे कारण म्हणजे  १ एप्रिल २०१६ पासून बँका एमसीएलआर (मार्जिनल कॉस्‍ट लेंडिंग रेट) वर कर्ज देत आहेत. व्याजदर निश्चीत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एमसीएलआरची सुरूवात केली आहे.

काय आहे आधार दर

आधार दर म्हणजे कर्जावरील व्याजाचा कमीत कमी दर. आधार दराच्या खाली कमी दराने बँकांना कर्ज देता येत नाही. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार प्रत्येक बँकांना आपल्या आधार दराचे पालन करणे अनिवार्य आहे. तरीही एसबीआयने आपल्या व्याजाच्या आधार कपात करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फायदा कर्जदारांना नक्कीच होणार आहे.

 

Check Also

Razorpayनेही आता एअरटेलबरोबर जारी केले युपीआय स्वीच कंपनीने जारी केलेल्या पत्रकातून माहिती

फिनटेक Fintech युनिकॉर्न रझोरपे Razorpay ने आज सांगितले की ते स्वतःचे UPI इन्फ्रास्ट्रक्चर लाँच करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *