Breaking News

केंद्रीय मंत्री गडकरींपाठोपाठ आता सरसंघचालक भागवतांकडून सैन्यदलाचा अवमान सैन्यदलाची माफी मागावी: खा. अशोक चव्हाण यांची मागणी

नांदेड : प्रतिनिधी भारतीय लष्कराला तयार व्हायला सहा-सात महिने लागतात. पण संघ स्वयंसेवक तीन दिवसात सज्ज होतात असे वक्तव्य करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी करत सैन्य दलाचा अवमान केल्याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी …

Read More »

हर्षल रावतेच्या आत्महत्या प्रकरणानंतर सरकारला आली जाग अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मंत्रालयात बसवली जाळी

मुंबई : प्रतिनिधी गेली महिनाभर मंत्रालयात येवून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मंत्रालयातील आवारात उडी मारून आत्महत्या करू नये म्हणून जाळी बसविण्याचा निर्णय घेत त्याची प्रशासनाने अंमलबजावणीही केली. धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अहमदनगरचा अविनाश शेटे यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर स्वत:वर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा …

Read More »

राज्याच्या शिक्षण विभागाकडून मोदीभक्तीच्या रसाची उधळण शालेय विद्यार्थ्यांसाठी फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुस्तकांपेक्षा जास्त मोदींच्या पुस्तकाची खरेदी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तरावरील नेत्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख व्हावी या उद्देशाने महात्मा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके खरेदी करून त्याचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप केले जाते. मात्र यावर्षी या राष्ट्रीय महापुरूषांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती मोदी भक्ती निर्माण व्हावी यासाठी ६० लाख रूपये खर्च करून गुजराती, …

Read More »

मराठवाड्यात दिवसभर गारपीट सुरूच वीज पडून एक व्यक्ती तर दोन जनावरे दगावली

औरंगाबाद: प्रतिनिधी मराठवाड्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यात दिवसभर गारपीट सुरुच असून वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर दोन जनावरे दगावली आहेत. या संदर्भात गारपीटग्रस्त भागात वेगाने पंचनामे करण्यासाठी स्थळपाहणी सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सुत्रांनी दिली. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यातील ९० गावांत गारपीट …

Read More »

रिलायन्स सांगे राज्य सरकार डुले आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठासाठी सरकारचे ४५० कोटी रूपयांवर पाणी

मुंबई : गिरिराज सावंत राज्यातील अनिल अंबानीच्या रिलायन्स एनर्जी कंपनींच्या  एक हजार ४५२ कोटी रूपयांंच्या थकीत कर वसूली अद्याप न करणाऱ्या राज्य सरकारने रिलायन्सवर आणखी एक मेहरबानी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने रिलायन्सच्याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठासाठी लागणाऱ्या जमिन खरेदीवरील  तब्बल ४५० कोटी रूपयांच्या महसूलावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. …

Read More »

मंत्रालयाची सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा सरकारला टोला

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयातील वाढते आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळ्या बसवून फारसा उपयोग होणार नाही. उलट जाळीवर उडी मारल्यास जीव जाणार नाही, फार तर हात-पाय तुटतील; पण आपल्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल,अशी भावना निर्माण झाल्यास अन्यायग्रस्त रोज मंत्रालयात उड्या मारू लागतील. त्यामुळे ही सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडविण्याचे सरकारने …

Read More »

नागराज मंजुळे, सुधारक ओलवे यांना समष्टी पुरस्कार 'सारं काही समष्टीसाठी' सोहळा १५ फेब्रुवारी रोजी तर जे.जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ढसाळ लिटरेचर फेस्टिवल

मुंबई: प्रतिनिधी पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती ‘सारं काही समष्टीसाठी’ सोहळा १५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रंगणार आहे. यावर्षी ढसाळ स्मृती समष्टी पुरस्काराने दिग्दर्शक व कवी नागराज मंजुळे, सुधारक ओलवे यांना सन्मानित केले जाणार आहे तर समष्टीचा विशेष गोलपिठा युवा पुरस्कार कवी सुदाम राठोड यांना प्रदान केला जाणार …

Read More »

औरंगाबादची राज्य कर्करोग संस्था उपचार व संशोधनासाठी मैलाचा दगड ठरेल केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नाड्डा यांचा विश्वास

औरंगाबाद: प्रतिनिधी भाभाट्रॉन-२ युनिटमुळे कर्करोगाच्या रुग्णांना अद्ययावत व जलदगतीने उपचार मिळण्यास मदत होणार असल्याने औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालय हे कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जे.पी. नाड्डा यांनी आज व्यक्त केला. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय …

Read More »

मस्वापचे अध्यक्ष नारायण राणे यांची धनंजय मुंडे यांना तंबी धनंजयने माझ्याविषयी नीट बोलावे

औरंगाबाद : प्रतिनिधी ज्या भाजपने राणेंचा स्वाभिमान जपला नाही. त्यांनी पक्ष काढून काय उपयोग अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्या टीकेचा समाचार घेत मस्वापचे अध्यक्ष नारायण राणे म्हणाले की ? धनंजय मुंढे यांनी माझ्याविषयी नीट बोलावे अशी तंबी देत त्यांनी भलते सलते बोलणे ही त्यांची योग्यता …

Read More »

राज्यापाठोपाठ आता केंद्र सरकारमधील एससी-एसटी कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द केंद्रीय प्रशासकिय न्यायालयाचा अर्थात कँटचा निर्णय

नवी दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयातील नागराज विरूध्द केंद्र सरकारच्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या विविध खात्यातील एससी-एसटीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळालेली पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून मुळ पदावर नियुक्ती द्यावी असे आदेश केंद्रीय प्रशासकिय न्यायालयाने अर्थात कँटने केंद्र सरकारला दिला आहे. तसेच या आदेशाची अंमलबजावणी पुढील ९० दिवसात करण्याचे आदेशही दिले. …

Read More »