Breaking News

राज्याच्या शिक्षण विभागाकडून मोदीभक्तीच्या रसाची उधळण शालेय विद्यार्थ्यांसाठी फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुस्तकांपेक्षा जास्त मोदींच्या पुस्तकाची खरेदी

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तरावरील नेत्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख व्हावी या उद्देशाने महात्मा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके खरेदी करून त्याचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप केले जाते. मात्र यावर्षी या राष्ट्रीय महापुरूषांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती मोदी भक्ती निर्माण व्हावी यासाठी ६० लाख रूपये खर्च करून गुजराती, मराठी भाषेतील मोदींची चरित्र पुस्तके खरेदी करून त्याचे वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.

विविध शाळांमध्ये पहिली ते ५ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महापुरूषांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी महात्मा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांची दरवर्षी चरित्र पुस्तके खरेदी केली जातात. तसेच ही पुस्तके त्या त्या शाळांच्या ग्रंथलयात पाठविली जातात. मात्र यंदाच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्र पुस्तकांची खरेदी शिक्षण विभागाकडून करण्यात येणार असून या राष्ट्रीय महापुरूषांपेक्षा सर्वाधिक पुस्तके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

फुले, गांधी, डॉ. आंबेडकर पुस्तकापेक्षा पंतप्रधान मोदी आणि चाचा चौधरी यांची ७२ हजार ९३३ गुजराती भाषेतील पुस्तके मागविण्यात येणार आहेत. तर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ७ हजार १४८ प्रती मागविण्यात येणार असून त्यासाठी ५९ लाख ४२ हजार रूपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील मराठी भाषेतील ६९ हजार ४१६ पुस्तकांची ४५ रूपये या दराने पुस्तकांची खरेदी करण्यात येणार आहे. याशिवाय ७२ हजार पुस्तके माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील पुस्तकांचीही याच दराने खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत बालभारतीचे संचालक डॉ.सुनिल मगर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या पुस्तकांची निवड शिक्षण विभागाच्या तज्ञ व्यक्तींकडून करण्यात आलेली आहे. केवळ मोदी हे पंतप्रधान आहेत म्हणून नव्हे.

modi book list.pdf

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *