Breaking News

Tag Archives: education minister vinod tawde

बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवर न्यायालयाच्या आदेशानुसार २ महिन्यात कारवाई शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांवर कारवाई करण्याबाबत शासन गंभीर आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याची कार्यवाही सुरु आहे, येत्या २ महिन्यात ही कार्यवाही पूर्ण करुन दोषी आढळलेल्या संबंधिताविरुध्द कारवाई करुन त्यांच्यावर आवश्यक कलमे लावण्यात येतील. तसेच बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांना पाठीशी घालण्यांविरुध्दही कारवाई करण्यात येईल असे आश्वासन …

Read More »

पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात रंगणार निवडणूका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणूकांमधून खऱ्या अर्थाने नेत्तृत्वाची संधी मिळावी व लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा यादृष्टीकोनातून पुन्हा एकदा महाविद्यालयीन निवडणूका घेण्यात येणार आहे. या निवडणूकांसाठी नियम तयार केले आहेत. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये तरतूद केल्याप्रमाणे पुढील काळामध्ये महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये …

Read More »

मीडियामुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणरेडी, विनोद तावडेंचा ‘राम’प्रताप म्हणे माध्यमांमध्ये नेहमी खऱ्या बातम्या नसतात

मुंबई : प्रतिनिधी भाजपचे आमदार राम कदम यांचा वाचाळगिरीचा प्रताप ताजा असतानाच आता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आता भर घातलीये. माध्यमांमुळे समाजात राजकारणाची घाणेरडी प्रतिमा तयार झालीय आहे असं वादग्रस्त शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलंय. एवढंच नाहीतर माध्यम दाखवतात त्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात असा जावाईशोधही तावडे यांनी …

Read More »

विशेष शिक्षक आणि परिचर यांचे न्यायालयाच्या निर्णयानुसार समायोजन करावे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी केंद्र पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर) योजनेअंतर्गत नियुक्त केलेल्या विशेष शिक्षक व परिचर यांना समायोजीत करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानुसार संबंधित १ हजार १८५ विशेष शिक्षक आणि ७२ परिचर यांना सेवेत समायोजीत करण्यात यावेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी …

Read More »

विद्यार्थ्यांकडून निम्मे शुल्क घेऊनच प्रवेश द्या राज्य शासनाच्या महाविद्यालयांना सूचना

मुंबई : प्रतिनिधी कृषी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सन २०१८-१९ या वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. आठ लाख पेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येते. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी अशा विद्यार्थ्यांकडून …

Read More »

राज्यातील सर्व शाळांमध्ये दर महिन्याच्या २१ तारखेला योग दिन साजरा होणार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली असून या दिवशी ‘योग दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्रातही शाळा महाविद्यालयात यादिवशी ‘योग दिन’ साजरा केला जात असताना, दर महिन्याच्या २१ तारखेला योगासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, अशा सूचना शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तावडे यांनी राज्यभरातील क्रीडा …

Read More »

मोटार बाईक अँम्ब्युलन्स सेवेतील नव्या वीस मोटार बाईकचे लोकार्पण मुंबईसह राज्यातील इतर भागातही बाईक अँम्ब्युलन्स सुरू होणार

मुंबई : प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक अँम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आज आणखी २० मोटार बाईकचा समावेश करण्यात आला असून, त्याचा लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात …

Read More »

तंत्र शिक्षणाची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आता ऑनलाईन मिळणार उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा सीडीएसएल व्हेंचर लिमिटेडशी सामंजस्य करार

मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व पदविका प्रमाणपत्र प्राप्तविद्यार्थ्यांची अंदाजे 9 लाख शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजीटल पद्धतीने नोंदणी करुन जतनकरुन ठेवण्यात येणार आहेत.  यासंदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सामंजस्यकरार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद म. मोहितकर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसलिमिटेडच्या अंतर्गत कार्यरत सीडीएसएल व्हेंचर लिमिटेडचे कार्यकारी संचालक तथा मुख्य तंत्रज्ञान  अधिकारी जॉयदिप दत्ता यांच्यात शैक्षणिक प्रमाणपत्रे ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबतचा हा सामंजस्य करार झाला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय व विश्वविद्यालय अनुदान आयोग यांच्या डिजीटल इंडियाच्या धोरणानुसार, ही नऊ लाख शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजीटल पद्धतीने नोंदणी करुन जतन करुन ठेवण्यात येणार आहेत. प्रमाणपत्रातील माहितीची सत्यता, सचोटी, गोपनीयता व सुरक्षतेची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. यासेवेद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राची डिजीटल अथवा प्रिंटेड कॉपी …

Read More »

नाशिक, नंदूरबारसह १३ जिल्ह्यातील जि.प.च्या शाळा होणार ‘आंतरराष्ट्रीय शाळा’ सिंगापूर, हाँगकाँग, जपान मधील शिक्षण पध्दतीवर शिक्षण देणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या सिंगापूर, हाँगकाँग, जपान या देशातील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून …

Read More »

१० वीच्या पुस्तकातील तो नकाशा नाहीच तर ती केवळ प्रतिमा पाठ्यपुस्तक मंडळाचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आणि संशोधन मंडळाने १० वीच्या तयार केलेल्या पाठ्यपुस्तकात जम्मू काश्मीरचा जो नकाशा दाखविण्यात आला त्यामधील बराचसा भाग देशाच्या सीमेबाहेर दाखविण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. त्यास तात्काळ पाठ्यपुस्तक मंडळाने त्यावर तात्काळ खुलासा करत तो नकाशा नसून अद्यावयत तंत्रज्ञानाने तयार केलेली …

Read More »