Breaking News

कृषी

आता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे होते. जागतिक स्तरावर सेंद्रिय उत्पादनांना असणारी वाढती मागणी त्यांना मिळणारे अधिकचे दर व राज्यातील सेंद्रिय शेतीस अनुकूल असणारी परिस्थ‍िती विचारात घेता सेंद्रिय शेती उत्पादनास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यासाठी …

Read More »

शरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही फलोत्पादनाच्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करणार-

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण उपलब्ध करणे, राज्यातील फलोत्पादन वाढीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण फळपिक विकसित करुन त्याचं ब्रॅन्डिंग करणे, वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्यूटच्या धर्तीवर फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था उभी करुन प्रत्येक जिल्ह्यात फळनिहाय शाखा निर्माण करणे आदी, …

Read More »

कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत राज्यातील ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. त्यामुळे राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकुण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. …

Read More »

तुम्हाला माहिती आहे का? राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या खरीपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण- कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई : प्रतिनिधी राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास ७० टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पीकपेरणी व पीकवाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्री …

Read More »

वेगळेपण दिसण्यासाठी बदल करण्याऐवजी केंद्राचा कृषी कायदा आहे तसा लागू करा भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील शेतकऱ्यांना मालाच्या विक्रीचे स्वातंत्र्य देण्यासाठी केलेल्या कृषी कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात राज्य सरकारने मांडलेली कृषी विधेयके म्हणजे केंद्राच्या कायद्यातील किरकोळ बदल आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण असून …

Read More »

पीक कर्ज वसुलीस ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ पण कर्ज फेड केल्यास व्याज सवलत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या कालावधीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा फायदा मिळणार असल्याचे असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सहकार मंत्री पाटील …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना ही ग्वाही म्हणाले… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

मुंबई : प्रतिनिधी शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या  हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकरी वर्गास देत राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. …

Read More »

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट

मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्य सरकारने ठाम भूमिका मांडावी यासाठी आज शेतकरी आणि सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावर शरद पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून विविध संघटनांच्या मागण्यावर चर्चा घडवून आणणार …

Read More »

ऊसाप्रमाणे दुधासाठीही एफआरपी कायदा: दुधालाही मिळणार हमी भाव शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मंत्री सुनिल केदार यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊसाला हमी भाव मिळावा यासाठी लागू करण्यात आलेल्या एफआरपी कायद्याच्या धर्तीवर राज्यातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपी कायदा आणणार असल्याचे आश्वासन पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी देत कायद्याची निर्मिती झाल्यानंतर दुधाला हमी भाव देण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करून त्यामध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात …

Read More »

१ जुलैपर्यंत राज्यभर कृषी संजीवनी मोहिम कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ही मोहिम १ जुलैपर्यंत सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. दरवर्षी १ …

Read More »