Breaking News

कृषी

फळबाग विमाचा पुढील २ वर्षाचा करार रद्द २०१९ च्या निकषाप्रमाणे नवीन निविदा काढाव्यात-डॉ. अनिल बोंडे यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे सरकारनी हवामानावर आधारित फळबाग विमा योजनाचे हवामानाचे निकष बदलवुन विमा कंपन्या सोबत २०२० ते २०२२ पर्यंत ३ वर्षाचा करार केला होता. या कराराने शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही फक्त कंपन्या मालामाल झाल्या. भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटविल्यानंतर शेवटी शासनाने माघार घेतली. आणि …

Read More »

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी शेती मालाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी आणि निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते बाजारात येऊ नये यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांची महत्वाची भूमिका आहे. तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांचा निकाल विहित कालावधीत देऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले. राज्यातील गुणनियंत्रण प्रयोगशाळांच्या कामाचा आढावा कृषीमंत्र्यांनी मंत्रालयात झालेल्या …

Read More »

नियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी  पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारणी केली जाईल. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ …

Read More »

शरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक आणले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.  …

Read More »

पंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या कृषी खतांच्या किंमती कमी करा

मुंबई: प्रतिनिधी देशात एकाबाजूला जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन लागू असताना सर्वसामान्य नागरीक, शेतकरी आदींना मदतीचा हात देण्याऐवजी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असलेल्या खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून शेतकरी वर्गाला आणि सर्वसामान्य नागरीकांना महागाईच्या खाईत लोटू पहात असल्याने हा निर्णय योग्य नसल्याचे सांगत ही भाववाढ तातडीने रोखण्याच्या अनुषंगाने …

Read More »

शेतकऱ्यांना धानाच्या भरडाईकरिता विशेष अनुदान मंजूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीची स्थिती लक्षात घेऊन तसेच अवकाळी पावसामुळे धानाची नासाडी होऊ नये म्हणून एकवेळची विशेष बाब म्हणून धानाच्या भरडाईकरिता अनुदान मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एकूण २४४ कोटी रुपये इतक्या रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पणन हंगाम …

Read More »

शेतकऱ्यांना खत पुरवठ्यासाठी युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन साठा खरीप हंगामासाठी खतं पुरवठ्याबाबत कृषीमंत्र्यांकडून आढावा

मुंबई : प्रतिनिधी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी. संघभावनेने काम करून खरीपासाठी शेतकऱ्यांना दिलासा …

Read More »

पेरणीपूर्वी बियाण्याची गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करावी कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत स्थानिकस्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वयाचे काम करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले. गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत मोठया प्रमाणात …

Read More »

तीन लाख शेतकऱ्यांच्या सहभागातून राज्यात स्थापन होणार दहा हजार कंपन्या कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यासाठीची योजना यशस्वी करण्याकरीता पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी. या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असाव्यात, असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज देत ३ लाख शेतकऱ्यांच्या सहभागातून …

Read More »

राज्यात आता सेंद्रीय-जैविक शेतीवर भर खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेती धोरणाबाबत बैठक संपन्न

मुंबई : प्रतिनिधी सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ मिळावी म्हणून जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या तयार करणे व त्यांचा जैविक शेती महासंघ तयार करणे या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व बँकाकडून सहकार्य मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »