Breaking News

कृषी

इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि निगडीत क्षेत्राचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे. शेतकरी संपन्न झाल्याशिवाय देशाच्या प्रगतीत अनेक अडचणी आहेत. आकांक्षित जिल्ह्यातही शेतीला समृद्ध केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. यादृष्टीने साखर उद्योग हा कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्यादृष्टीने महत्वाचा …

Read More »

अजित पवार म्हणाले; गोवंश संवर्धनाचे काम करा, आवश्यक निधी देणार देशी गाय व संशोधन केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे काम व्हावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय समाज व्यवस्थेत गोवंशाला अन्यन्यसाधारण महत्व आहे. शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देशी जातीच्या गोवंश संवर्धनाचे काम व्हावे. या केंद्रासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात देशी गाय संशोधन व …

Read More »

कर्नाटकच्या कृषीमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर म्हणाले, तिकडेही महाराष्ट्रातील योजना राबविणार कृषी उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान - कृषी मंत्री दादाजी भुसे

भाजी आणि फलोत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांना आम्ही अन्नदाता संबोधतो. कर्नाटक राज्याप्रमाणे ‘ई-पिक पाहणी’ ॲप राज्यात कार्यरत असून, त्याचा लाभ शेतक-यांना होणार असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथिगृहात कर्नाटकचे कृषी मंत्री बी.सी. पाटील यांच्या समवेत शिष्टमंडळाने कृषी …

Read More »

अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांनी उत्कृष्ट उत्पादनासाठी रंग, सुवास, रुप, चव यावर काम करावे जीआय बोर्डासाठी तत्काळ प्रस्ताव द्या भौगोलिक मानांकित उत्पादने विक्री

उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी केली होती. त्याची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. यासाठी पक्षविरहित काम करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमखास भाव मिळण्यासाठी विकेल ते पिकेल ही संकल्पना मांडली आणि त्यादृष्टीने कृषी विभाग काम करत आहे. जीआय मानांकन ही …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्य उत्पादनात ३९ टक्के वाढ, शेत मालाला हमखास भाव पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नको - भुसे

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म …

Read More »

अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा शासनाचा प्रयत्न प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेतील नूतन संकुलाचे लोकार्पण

कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विशेषत: महिलांना शेतीपूरक व्यवसाय आणि प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हवेली तालुक्यातील वडमुखवाडी (चऱ्होली) येथील प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण संकुलाच्या …

Read More »

“या” शेतपीकांच्या उत्पादनाच्या वाढीसाठी राज्य सरकार देणार एक हजार कोटी कापूस, सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी विशेष कृती योजना

कापूस आणि सोयाबीनची उत्पादकता वाढविण्याच्या विशेष कृती योजनेस तीन वर्षात एक हजार कोटी निधी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या विशेष कृती योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात येणार आहे. राज्यातील कापूस पिकाखाली ४२ लाख हेक्टर व सोयाबीन पिकाखाली …

Read More »

पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून बियाणांची उपलब्धता वाढवा - कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-२०२२ मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे …

Read More »

आधारभूत किंमतीनुसार हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी १७ मे पर्यंत नोंदणी करा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

किमान आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी आतापर्यंत ४ लाख ९४ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. मार्चपासून आजतागायत ५०.८४ लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, उद्दीष्टपूर्तीसाठी दि. १७ मे २०२२ पर्यंत नोंदणीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले …

Read More »

महाविकास आघाडी उभारणार, देशातील पहिलाच प्रकल्प जनुक कोष राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

देशातील पहिल्याच अशा महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पातील शिफारशीनुसार राज्यभरात अंमलबजावणी केल्यास राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन होऊन येणाऱ्या पिढीकरीता नैसर्गिक संसाधने जतन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने सन …

Read More »