Breaking News

माहिती न देताच अर्थमंत्री म्हणाल्या शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रम योजनांची शेतकऱ्यांना उस्तुकता

नवी दिल्लीः प्रतिनिधी
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीकरीता १६ कलमी कार्यक्रम आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. मात्र १६ कलमी कार्यक्रम काय आहेत याची माहिती देण्याचे टाळले.
प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आलं आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करावी लागेल त्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी आम्ही १६ कलमी कार्यक्रम आणतो आहोत. ज्याद्वारे शेतकऱ्यांची प्रगती करणाऱ्यावर भर दिला जाईल. सौर उर्जेवर शेती पंप सुरु केले आहेत. आणखी १५ लाख शेतकऱ्यांना ,सौरऊर्जा पंप देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
कृषी आणि सिंचनसाठी २.६८ लाख कोटींची तरतूद
कृषी आणि सिंचनासाठी २.८३ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी सुरु करणार किसान रेल योजना
किसान रेल योजना सुरू करून दूध, मांस, मासे वाहतूक करणे सुसह्य करणार.

एप्रिल २०२० पर्यंत जीएसटीचं नवं व्हर्जन येणार
एप्रिल २०२० पर्यंत जीएसटीचं नवं व्हर्जन येणार असल्याची घोषणा आहे. २७ कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर आले असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
जीएसटी कर लागू करणं हे देशाच्या प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल होतं. तसंच महागाई नियंत्रणात ठेवण्यात आम्हाला यश आलं असंही त्या म्हणाल्या आहेत.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *