Breaking News

उदयनराजेंनी लाचारी दाखवून दिली गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत असल्याचे जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
उदयनराजे भाजपात गेल्यानंतर त्यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत कुठेही निषेध केला नाही किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले नाही. याचा अर्थ इतरांकडे बोट दाखवून त्यांची लाचारी काय आहे हे दाखवून दिल्याचे प्रतित्तुर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नामदार नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले यांना दिले.
उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे.
उदयनराजे काही मिळते का म्हणून भाजपात गेले होते आणि आता पुढे काही मिळते का यासाठी ते लाचारीने बोलत आहेत असा थेट आरोपही त्यांनी केला.
जाणता राजा हा शब्द पवारसाहेबांनी स्वतः ला लिहिला नाही. जाणता राजाचा अर्थ आहे की, ज्याला सर्व विषयांची जाण आहे. पक्षाने त्या शब्दाचा कधी वापर केला नाही. आदित्यनाथ आणि गोयल मोदींचे सरळ नाव घेवून सांगत आहेत त्यावर उदयनराजे काही बोलले नाहीत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
शिवाय आम्ही शिवआघाडी असं नाव कधी ठेवलं नाही. आमचं महाराष्ट्र विकास आघाडी असं नाव आहे हे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
नवाब मलिक यांनी गोयल नावाच्या माणसाकडून मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यासह देशात विरोधाचे वातावरण निर्माण झाले. काल रात्री प्रकाश जावडेकर यांनी प्रेस घेवून सांगितले की, त्या लेखकाने माफी मागून पुस्तक मागे घेतले आहे. परंतु आमची माहिती अशी आहे की, ते लेखक पुस्तक मागे घ्यायला तयार नाहीत, माफी मागायला तयार नाही. त्यामुळे भाजपाच्या कार्यालयात जावडेकर आणि गोयल यांनी एकत्र बसून पत्रकार परिषद घ्यायला हवी आणि गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत आहे असे जाहीर करावे अशी स्पष्ट मागणीही त्यांनी केली. दरम्यान जोपर्यंत पुस्तक मागे घेत नाही आणि जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत देशातील जनता गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *