Breaking News

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नाराजांची भाजप नेत्यांच्या घरी गाठी-भेटी कृपाशंकर सिंह, राष्ट्रवादीचे जयदत्त क्षिरसागर भाजपच्या रांगेत

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. परंतु राजकिय क्षेत्रात यानिमित्ताने एका पक्षातील नाराजांनी सत्ताधारी पक्षातील वजनदार नेत्यांच्या घरी गाठ-भेटी घेण्याच्या मार्गाला लागले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने  

यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर काँग्रेसचे नाराज नेते आणि अडगळीत पडलेले कृपाशंकर सिंह यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या घरी आमंत्रित केले. त्यानंतर बीड जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांनीही आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांच्या घरी हजेरी लावत (अ) राजकीय चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकिय निवासस्थानीही भेट देत त्यांच्या घरच्या गणपतीची पूजा केली.

एकेकाळी बीड आणि मराठवाड्यातील राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयदत्त क्षिरसागर यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात येत होते. मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यापासून आणि जिल्ह्यातील पक्षाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपविल्यापासून क्षिरसागर हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत. त्यातच मधल्या काळात त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या वावड्याही मोठ्या प्रमाणावर उठल्या होत्या. परंतु त्यांनी त्यावेळी जाणीवपूर्वक आणि जाहीररित्या भाजप नेते किंवा मंत्री यांच्या घरी किंवा संपर्क करण्याचे टाळले होते.

परंतु यावर्षी पहिल्यांदाच जयदत्त क्षिरसागर यांनी उघडपणे गणेशोस्तोवाच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या घरातील गणरायाचे दर्शन घेतले.  

यंदाचा गणेशोस्तव नाराजांना पावणार की भाजपाला पावणार याचे उत्तर आगामी निवडणूकांमध्ये मिळणार आहे. तोपर्यत थांबा आणि वाट पहावी लागणार. 

  

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *