Breaking News

नाना पटोले, सुषमा अंधारे यांच्या मागणीला यशः ससूनप्रकरणी चौकशी समिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ससून रूग्णालयात ललित पाटील भूषण पाटील या अंमली पदार्थ तस्करांना दाखल करून घ्यावे या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाचे मंत्री दादाजी भुसे यांनी रूग्णालय प्रशासनाला फोन केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती. त्याननुसार या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी अखेर वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज चौकशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये देण्यात आली.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अमली पदार्थ प्रकरणी चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे अध्यक्ष असून सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. हेमंत गोडबोले, मुंबई ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एकनाथ पवार हे सदस्य म्हणून काम पाहतील.

या समितीने सखोल चौकशी करून आपला सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Check Also

जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र, निवडणूक आयोगाच्या गलथानपणाचा मतदारांना फटका

महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादी मधून अनेकांचे नाव गहाळ झाली होती तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *