Breaking News

Tag Archives: minister dadaji bhuse

नाना पटोले यांची टीका, खोकेवाल्यांच्या सरकारमध्ये खोक्यांसाठी मारामारी

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार होणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा झाला असून विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की, मारहाण करणे हे भूषणावह नाही तर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी निधी

संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारी आढावा बैठक वर्षा निवासस्थान येथे पार पडली. या बैठकीला पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, …

Read More »

दोन महिन्याच्या आत राज्यातील एसटी बसस्थानकांचे सुशोभीकरण

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे २५१ एसटी बस आगार, ५७७ एसटी बस स्थानके आहेत. एसटी महामंडळाकडे भाडेतत्त्वावर ४६७ बस असून महामंडळाच्या स्वमालकीच्या १५ हजार ७९५ एसटी बसेस आहेत. या बसेस मधून दररोज ५४ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. एवढे मोठे जाळे असलेल्या महामंडळाच्या एसटी बस स्थानकांचे दोन महिन्याच्या आत सुशोभीकरण व …

Read More »

नाना पटोले, सुषमा अंधारे यांच्या मागणीला यशः ससूनप्रकरणी चौकशी समिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ससून रूग्णालयात ललित पाटील भूषण पाटील या अंमली पदार्थ तस्करांना दाखल करून घ्यावे या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाचे मंत्री दादाजी भुसे यांनी रूग्णालय प्रशासनाला फोन केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती. त्याननुसार या प्रकरणातील सत्य बाहेर …

Read More »

ट्विट राऊतांचे पण नाव घेतले शरद पवारांचे यावरून मंत्री भुसे आणि अजित पवारांमध्ये रंगली खडाजंगी राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत आंदोलन...

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मंत्री शासकिय कागदपत्रे सभागृहात सादर केल्यानंतर मंत्री दादाजी भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटचा उल्लेख करत ४८ अन्वये निवेदन करण्यास सुरवात केली. पण संजय राऊत यांच्या आरोपांना आव्हान देण्याच्या नादात मंत्री दादाजी भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांचे नाव घेतल्याने …

Read More »

आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

आगामी आर्थिक वर्षात नवे  महिला  सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. सहयाद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात बंदर व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे बोलत होते. …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, शेतकरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे १ जुलै या कृषीदिनापासून वाटप

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप १ जुलै या कृषी दिनापासून करण्यात येणार आहे. कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच …

Read More »

पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून बियाणांची उपलब्धता वाढवा - कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-२०२२ मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे …

Read More »

महाविकास आघाडी उभारणार, देशातील पहिलाच प्रकल्प जनुक कोष राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

देशातील पहिल्याच अशा महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पातील शिफारशीनुसार राज्यभरात अंमलबजावणी केल्यास राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन होऊन येणाऱ्या पिढीकरीता नैसर्गिक संसाधने जतन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने सन …

Read More »

केंद्रीय कृषीमंत्री तोमरजी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरपाई द्यायचीय विम्याचे पैसे द्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात जुलै-२०२१ मध्ये पावसाने दिलेली ओढ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर -२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले.  शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा ९०० कोटी रुपयांचा केंद्राचा हिस्सा लवकरात लवकर द्यावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणे शक्य होईल, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह …

Read More »