Breaking News

निवडणूक आयोगः ठाकरे गटाने युक्तीवादावेळी शिंदे गटाच्या नियुक्त्यांवर घेतला आक्षेप २० जानेवारीला पुन्हा होणार सुनावणी

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. यावेळी शिंदे गटाने संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतल्याचे दिसून आले.

या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाचे आमदार धनुष्य बाणावरच निवडून आले आहेत. त्यांच्या एबी फॉर्मवर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची सही आहे. ज्यांना आम्ही धनुष्यबाण चिन्ह दिलं, त्यातले काही लोकं फुटून बाहेर पडले, याचा अर्थ पक्षात फूट पडली, असे म्हणता येणार नाही. काही आमदार-खासदार निघून गेले असतील, मात्र, पक्ष जागेवर आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, तसेच पक्षातील फुटीचा जो देखावा निर्माण केला जातो, तो आभासी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत निर्णय लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करू नये, असे मतही व्यक्त केले.
कपिल सिब्बल यांचा आयोगासमोर युक्तीवाद

उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिंदे गट म्हणजे शिवसेना नाही. ती कपोलकल्पित फूट आहे असेही कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात म्हणाले, आमदारांनी स्वतः पक्ष सोडला आहे त्या घटनेचा पक्षावर काहीही परिणाम होणार नाही असंही कपिल सिब्बल यांनी सांगितले. सर्वोच्च न्यालयाचा निकाल येईपर्यंत आपण कुठलाही निर्णय घेऊ नये अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाने जी प्रतिज्ञापत्रं दाखल केली आहेत ती बोगस आहेत असाही दावा कपिल सिब्बल यांनी केला.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचं भासवलं जातं आहे कपोलकल्पित आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या गटाने जे दावे मागच्यावेळी केले होते ते आज कपिल सिब्बल यांनी खोडून काढले. तसेच मूळ शिवसेना आम्हीच आहोत आणि शिवसेनेत जी काही फूट पडल्याचं बोललं जातं आहे त्याचा पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही असंही कपिल सिब्बल यांनी आपला युक्तीवाद करताना सांगत ही फूट मुळीच ग्राह्य धरू नये असेही कपिल सिब्बल म्हणाले.

आमच्याकडे आमदार आणि खासदार यांचं संख्याबळ आहे. त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते. मात्र आज हा दावा कपिल सिब्बल यांनी खोडून काढला आहे. आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला जातो आहे. ठाकरे गटाकडून ही मागणी करण्यात येते आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागल्याशिवाय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये. तर सर्वोच्च न्यायालयात कुणाचंही निलंबन झालेलं नाही त्यामुळे निर्णय द्यावा अशी मागणी जेठमलानी यांनी केली होती.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिंदे गट म्हणजे शिवसेना नाही. ती कपोलकल्पित फूट आहे असेही कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात म्हणाले, आमदारांनी स्वतः पक्ष सोडला आहे त्या घटनेचा पक्षावर काहीही परिणाम होणार नाही असंही कपिल सिब्बल यांनी सांगितले. सर्वोच्च न्यालयाचा निकाल येईपर्यंत आपण कुठलाही निर्णय घेऊ नये अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाने जी प्रतिज्ञापत्रं दाखल केली आहेत ती बोगस आहेत असाही दावा कपिल सिब्बल यांनी केला.

२१ जून २०२२ ला शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे हे सुरूवातीला १५ आमदारांना सोबत घेत नॉट रिचेबल झाले. त्यानंतर ही संख्या ४० पर्यंत गेली. या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. उद्ध ठाकरेंनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर ३० जूनल २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी दावा सांगितला आहे. चिन्ह आणि पक्ष कुणाचा ही लढाई निवडणूक आयोगात सुरू आहे. तर निलंबन आणि इतर याचिकांवर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *