Breaking News

‘युपीएसी’ परिक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएसीच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज ४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (VASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी, पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

ऑन लाईन पद्धतीने प्रवेश अर्ज ४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर पर्यंत आहे. प्रवेश परीक्षा ४ डिसेंबर २०२२ (ऑफलाइन पद्धतीने) घेण्यात येईल परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे.

लोकसेवा आयोगाकडून सरळ सेवा भरतीकरीता-१ व २ डिसेंबर २०२२ रोजी चाळणी परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता विविध संवर्गासाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा १ व २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आहे.

परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येणार आहे. विविध विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गट अ, प्रशासकीय अधिकारी गट ब व सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब संवर्ग करिता एकत्रितरीत्या चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकत्रित चाळणी परीक्षा मधील गुणांच्या आधारे अर्ज केलेल्या संबंधित संवर्गाच्या निवडीसाठी गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांचा विचार करण्यात येईल, तसेच एकत्रित परीक्षेमधील गुणांच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव दक्षता, धोरण व संशोधन यांनी सांगितले आहे.

या परीक्षेची माहिती उदा. शासनाचा विभाग, संवर्ग, परीक्षेचे ठिकाण, वेळ, परीक्षेची तारीख यासंदर्भातील सविस्तर माहिती लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *