Breaking News

फोगाट मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, गरज पडल्यास सीबीआयकडे हरियाणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या फोननंतर दिली माहिती

हरियाणातील भाजपा नेत्या तथा बिग बॉस फेम आणि टीक टॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी नवनवीन माहिती पुढे येत आहे. गोवा पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल करत तिच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली. दरम्यान या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास गरज पडल्यास सीबीआयकडे सोपविण्याची तयारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दर्शविली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर ही माहिती दिली.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी बोलून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली. सोनाली फोगाट यांच्या कुटुंबीयांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तशी विनंती केली असून, सीबीआयने हे प्रकरण ताब्यात घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे. मला यात काही अडचण नाही. आज सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर, गरज पडल्यास मी हे प्रकरण सीबीआयकडे देईन असेही ते म्हणाले.

हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा प्रमोद सावंत यांना फोन आल्यानंतर सावंत यांनी माध्यमांशी बोलताना वरील माहिती दिली. शिवाय, शनिवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सोनाली फोगाटच्या कुटुंबियांना तिच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता भविष्यात सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाण्याची शक्यता दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फोगाट यांच्या मृत्यू होण्याच्या आदल्या रात्री त्या ज्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी करत होत्या त्या रेस्टॉरंचा मालक एडविन न्युन्स आणि ड्रग्ज डीलर दत्तप्रसाद गावकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. याआधी पोलिसांनी हरियाणामधील भाजपा नेत्याचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांना १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Check Also

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *