Breaking News

बोटीत शस्त्रास्त्र साडल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली ‘ही’ माहिती बोट वाऱ्याने हरिहरेश्वरच्या किनारी

आज श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट स्थानिकांना आढळून आली. स्थानिक रहिवाशांनी ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, बोटीची पाहणी केली असता, या बोटीत ३ एके-४७ रायफल आणि काडतूस तसेच बोटीची कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर तत्काळ हायअलर्ट जारी करण्यात आला. तसेच याची माहिती भारतीय कोस्टगार्ड आणि इतर यंत्रणांनाही देण्यात आली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित करत राज्य सरकारचे लक्ष वेधले. तसेच याप्रश्नी गृहमंत्री, राज्य सरकारने निवेदन करावे अशी मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील निवेदन केले.

पुढे ते म्हणाले, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव लेडीहान असून ती एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची आहे. हाना लॉडर्सगन असं या ऑस्ट्रेलियन नागरिकाचे नाव असून ती एक महिला आहे. तीचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान आहेत. ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. मात्र, बोटीचे इंजिन बिघडल्याने बोटीवरील सर्वांना रेस्क्यू करण्यात आले. तसेच समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही. त्यामुळे ती बोट रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आली, असेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात पोलिस यंत्रणा, एटीएस मार्फत वेळ आल्यास चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *