Breaking News

लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणीमध्ये उडाली शाब्दीक चकमक भाजपा खासदारांकडून सोनिया गांधी यांना घेराव

लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. त्यावरून लोकसभेत भाजपाच्या सदस्यांनी काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित केले. याच कालावधीत सोनिया गांधी या भाजपाच्या ज्येष्ठ खासदार रमा देवी यांना भेटण्यासाठी भाजपा सदस्य बसतात त्या बाकाकडे गेल्या. तेथे या दोघींमध्ये चर्चा चालू असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी यांना उद्देशून मी तुम्हाला काही मदत करू शकते का? असा सवाल करत मी तुमचे नाव घेतल्याचे सांगितले. त्यावर सोनिया गांधी यांनी प्लीज डोन्ट टॉक विथ मी अर्थात माझ्याशी बोलू नका असे इराणी यांना सुनावले.

त्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी सोनिया गांधी यांना घेराव घालून वाईट वागणूक दिल्याचा आरोप काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी करत स्मृती इराणी यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली.

अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपाच्या खासदारांनी लोकसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हणाल्या की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा अवमान सोनिया गांधींच्या सहमतीनेच झाला आहे. राष्ट्रपत्नी म्हणून संबोधण्यास सोनिया गांधी यांनी मान्यता दिली आहे. देशाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या महिलेचा अवमानही सोनिया गांधींच्या सहमतीनेच करण्यात आल्याचा गंभीर आरोप इराणी यांनी केला.

त्यामुळे सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी स्मृती इराणी यांनी केली. यावेळी भाजपाच्या खासदारांनी सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करणारे फलकही फडकाविले.

या गोंधळातच लोकसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित कऱण्यात आले. कामकाज स्थगित कऱण्यात झाल्यानंतर सोनिया गांधी या त्यांच्या पक्षाच्या दोन खासदारांसह पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या बाकावरून सत्ताधारी बाकाकडे गेल्या. तेथे भाजपाच्या ज्येष्ठ खासदार रमा देवी यांच्याशी त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यावेळी सोनिया गांधी रमा देवी यांना म्हणाल्या, अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल आधीच माफी मागितली आहे. मग माझी काय चुक असा सवाल केला.

ही चर्चा सुरु असतानाच केंद्रीय स्मृती इराणी या सोनिया गांधी यांच्या जवळ गेल्या मॅडम मे आय हेल्प यु असे म्हणत मी तुमचे नाव घेतल्याचे सांगितले. त्यावर सोनिया गांधी यांनी माझ्याशी बोलू नकोस असे सुनावले.

या घटनेबाबत काँग्रेस नेत्याने सांगितले की, भाजपा खासदार रमा देवी यांच्याशी सोनिया गांधी यांची अत्यंत शांत चर्चा सुरु होती. त्यावेळी स्मृती इराणी या सोनिया गांधी यांच्याकडे हात दाखवित आल्या आणि म्हणाल्या, तुमची हिंमत कशी झाली, तुम्ही अशा पध्दतीने वागू शकत नाही. हे काही तुमच्या पक्षाचे कार्यालय नाही.

त्यावेळी सोनिया गांधी स्मृती इराणी यांना दोन वेळा म्हणाल्या मी तुमच्याशी बोलत नाही. त्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी सोनिया गांधी यांना घेराव घालण्यास सुरुवात केली. तसेच सोनिया गांधी यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्वक बनली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि तृणमुल काँग्रेसच्या मुहुआ मोईत्रा, अपारूपा पोद्दार यांनी सोनिया गांधींना भाजपाच्या खासदारांपासून बाहेर काढले. त्यानंतर केंद्रीय सांसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याप्रकरणात हस्तक्षेप करत तणावपूर्वक परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर सोनिया गांधी यांनी सांगितले की, मी भाजपाच्या सदस्या रमा देवी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना ओळखते. त्यामुळे त्यांना मी हेच सांगायला गेले होते की अधीर रंजन यांनी माफी मागितली आहे पण माझ्यावर का टीका असे त्या म्हणाल्या.

या घटनेनंतर केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सोनिया गांधी यांच्यावर उलट टीका करत म्हणाल्या की, आमच्या खासदार रमा देवी यांच्याशी बोलायला सोनिया गांधी या आल्याने आमचे अनेक खासदार घाबरले. त्यामुळे आमच्या एका महिला खासदारांने यासंदर्भात त्यांना विचारणा केली. मात्र सोनिया गांधी यांना माझ्याशी बोलू नका असे सांगितले. त्यामुळे काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याकडून अशा पध्दतीचे आक्रमक वागणे पाह्यल्याचे त्या म्हणाल्या.

तर संतप्त काँग्रेस नेत्यांकडून या संपूर्ण घटनेला स्मृती इराणीच जबाबदार असल्याचा आरोप केला इराणी यांनीच सोनिया गांधी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपही केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वि़ट करत म्हणाले, लोकसभेत आमच्या नेत्यांच्या विरोधात स्मृती इराणी यांनी अतिशय अपमानजनक वागणूक दिली आहे. लोकसभा अध्यक्ष या गोष्टीची दखल घेतील की फक्त नियम विरोधकांनाच दाखवतील.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *