Breaking News
Ajit Pawar
Ajit Pawar

भुयारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, कशाला पराचा कावळा करताय… असं बोलत असतात असे सांगत दुर्लक्ष करण्याचे आवाहन

विधान परिषद निवडणूकीसाठी येत्या २० जून रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत झालेल्या दगाफटक्याची पुर्नरावृत्ती होवू नये यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या खबरदारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना कशाला पराचा कावळा करताय असं बोलतच असतात असे सांगत फारसे लक्ष देण्याची आवश्यकता देण्याची गरज नसल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ही उपस्थित होते.

आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांना आम्ही सांगितले की, होय आम्ही फोन केला होता. शिवसेनेकडे त्यांच्या पक्षाचे ५५ आणि अपक्ष मिळून ६० चा आकडा होतोय. तर आमच्या दोन आमदारांना मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी न दिल्याने आमची संख्या ५१-५२ होतेय. पण काँग्रेसची संख्या ४४ आहे. आता सरकारमध्ये एकत्र असल्याने कोणाला किती संख्या कमी पडतेय, कोणाचे जास्त होतायत यातून सगळ्यांना मतांचा कोटा सर्वांना मिळावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही फोन केला. काँग्रेसनेही त्या आमदारांना फोन केला. बाळासाहेब थोरातांनी याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. परंतु आमच्यात कोणताही गैरसमज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी देवेंद्र भुयार यांनी संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, कशाला उशीच पराचा कावळा करताय असं बोलतच असतात. या कानाने ऐकून घ्यायचं अनं त्या कानाने सोडून द्यायचं अशी आपल्या मराठीत म्हण असे सांगत त्या गोष्टीला फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *