Breaking News

जयंत पाटील म्हणाले, भोंग्याचे गुजरात, उत्तर प्रदेशात काय झाले चौकशी करा म्हणा भोंग्यावरून लगावला टोला

मागील काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्यावरून आणि हिंदूत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्याचा सातत्याने पुर्नरूच्चारही करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या टीकेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला असून जरा गुजरात आणि उत्तर प्रदेशात भोंग्याचे काय झाले याची चौकशी करा असा उपरोधिक सल्लाही दिला.

राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने राज्यभरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्त साताऱ्यातील वाई मतदार संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्याप्रसंगी माध्यमांनी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरेंवर टीका केली.

धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठीच भोंगे कुठे लावा, कुणाच्या मशिदीसमोर लावा… हे करा ते करा असं सांगितलं जातय. गुजरातमध्ये मशिदींवरील भोंगे बंद झाले आहेत का?, उत्तर प्रदेशात बंद झाले आहेत का? याची जरा चौकशी करून या म्हणा असा खोचक सल्लाही त्यांनी राज ठाकरे यांना यावेळी दिला.

राज ठाकरेंच्या मुद्य्यांचा आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर काही परिणाम होऊ होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, राज ठाकरेंना लोक फार ओळखून आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाय, राज ठाकरेंच्या सभांमधील भाषणांवरून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. राजकीय नेते मंडळींच्या विविध प्रतिक्रिया यावरून उमटत आहेत. जोरदार टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *