Breaking News

महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची राज ठाकरेंना विनंती

महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केली.
आज राष्ट्रवादीच्या जनता दरबार उपक्रमाला आले असता माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी वरील विनंती केली.
महाराष्ट्र शांत आहे… कुठेही क्लेश नाही… द्वेष दिसत नाही… सर्व समाज एकत्र वावरताना दिसत आहेत असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय… त्यांच्या खिशात पैसे नाहीयत… गॅस महाग झालाय… पेट्रोल – डिझेल महागलंय… भाज्या… केरोसिन महाग झालंय… खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सर्वच महाग झालंय याबाबत काही बोलत नाहीत. मात्र जे गरजेचं नाही ते इश्यू बनवले जात असून मुख्य विषयापासून दुसरीकडे नेण्याचे काम सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला.
गॅसबद्दल… पेट्रोल – डिझेल… महागाई याबद्दल बोला ना… ही महागाई गरीबांना किती खाते आहे याबद्दल बोला… श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना ‘राम नाम सत्य है’ बोलायला लावू नका असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
पाडव्यानिमित्त मनसेने आयोजित केलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे उतरविले पाहिजे असे सांगत जर कोणी मस्जिदीवरील भोंगे उतरविणार नसेल तर त्या मस्जिदीसमोर मोठे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करा असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना देत मुंबईसह मुंब्र्यातील मदरशांमध्ये काय चाललंय ते बघा, फारच गंभीर प्रकार सुरु असल्याचे सांगत त्याच्यावर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करत असल्याचेही राज ठाकरे यांनी जाहीर केले.
राज ठाकरे यांच्या या आदेशानंतर चांदीवली येथील महेंद्र भानुशाली यांनी भोंगे लावून हनुमान चालिसा लावली होती. मात्र मुंबई पोलिसांनी सदरचे भोंगे काढत भानुशाली यास पाच हजाराचा दंड करत पुन्हा भोंगे लावल्यास अटक करणार असल्याची इशारा नोटीसही बजाविली. तर गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी त्याचवेळी राज ठाकरे यांना आव्हान करत म्हणाले की, सकाळी लवकर उठून मुंब्य्राला या सगळे मदरशे फिरवितो. तेथे साधा दाढी करायचा वस्तरा जरी मिळाला तरी मी राजकारण सोडेन असा इशारा दिला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी राज ठाकरे यांना उद्देशून महाराष्ट्र पेटेल असे वक्तव्य करू नका असे आवाहन केले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *