Breaking News

डेहराडूनमधील ७८ वर्षिय महिलेने आपली संपत्ती केली राहुल गांधीच्या नावे भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातील मोठी घटना

देशातील प्रत्येक राज्यात बिगर भाजपा सरकारच्या विरोधात रान उठवून आपणचं कसे चांगले आणि हिंदूत्वावादी विचाराचे आहोत यासाठी भाजपाकडून जीवाचे रान करत साम, दंड आणि भेद नीतीचा वापर करण्यात येत आहे. परंतु भाजपाशासित उत्तराखंडमधील ७८ वर्षिय वयोवृध्द महिलेने आपली संपूर्ण मालमत्ता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावे केल्याची आणि त्याचा स्विकारही राहुल गांधी यांनी केल्याची घटना घडली.
देशाच्या इतिहासात अशा प्रकारची तुरळक घटना कदाचित पहिल्यादाच घडली असेल. एका वृद्धेने तिची संपूर्ण संपत्ती काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नावे केली आहे. यामध्ये तिची मालमत्ता आणि दागिन्यांचा समावेश आहे. या वृद्धेनं न्यायालयात तिचे मृत्यूपत्र सादर करून तिच्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले. या ७८ वर्षिय महिलेचे नाव पुष्पा मुंजियाल असे आहे.
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, पुष्पा मुंजियाल या उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये राहतात. त्यांचे वय ७८ वर्ष आहे. पुष्पा यांनी त्यांची ५० लाखांची संपत्ती आणि १० तोळे सोन्यासह त्यांची सर्व मालमत्ता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केली. पुष्पा मुंजियाल यांनी डेहराडून न्यायालयात एक मृत्यूपत्र सादर केले असून, त्यांच्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले.
पुष्पा मुंजियाल यांनी राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचे म्हटलेय. मी राहुल गांधींच्या विचारांनी खूप प्रभावित आहे आणि म्हणूनच माझी संपत्ती त्यांना देत असल्याचे पुष्पा मुंजियाल यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी सांगितले की, पुष्पा मुंजियाल यांनी माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे मृत्यूपत्र आणि मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधींना दिल्याची कागदपत्रे सोपवली.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *