Breaking News

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा रयतचे विश्वस्त एन.डी.पाटील यांचे निधन ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील शेतकरी कामगार पक्षातून सत्तेच्या हव्यासापायी अनेक जणांनी इतर पक्षात प्रवेश करत सत्ता उपभोगली. मात्र शेकापच्या विचारावर अढळ निष्ठा ठेवत शेवटपर्यत शेकापमध्ये रहात विविध सामाजिक लढ्यात आपले योगदान देणारे प्रा.एन.डी.पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी कोल्हापूरात निधन झाले. मागील दिवसापासून त्यांची तब्येत ठिक नसल्याने पाटील यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या निधनानंतर अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहण्यास सुरु केली होती. महाराष्ट्र कर्नाटक सीमेप्रश्नी उभारलेल्या लढ्यात ते शेवटपर्यंत होते.

कोरोनाचा दुसऱ्या लाटेत त्यांना विषाणूची लागण झाली होती. परंतु कोरोनावर त्यांनी मात करत परत आपल्या सामाजिक कार्यक्रमात सक्रियही झाले होते. उभ्या महाराष्ट्रात त्यांचे व्यक्तीमत्व हे अभ्यासू आणि झुंझार नेतृत्व अशीच होती. त्यांनी कायम कामगार आणि शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. महामुंबई सेजच्या विरोधात उभारण्यात आलेल्या लढ्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.

एन.डी.पाटील यांचे पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असे होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए आणि एल.एल.बी चे शिक्षण घेतलं होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना ट्विटर आणि समाजमाध्यमातून आदरांजली वाहीली.

एन.डी.पाटील यांनी भूषविलेली पदे आणि मिळालेले सन्मान

१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य.

भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

एन.डी.पाटील यांचे साहित्य

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )

 

 

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *